नवीन नांदेड- नांदेड ग्रामीण पोलिसांनी काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव, गंगाबेट व कल्लाळ परिसरातील गोदावरी नदीपात्रात मोठी कारवाई करत जवळपास ₹1 कोटी 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान काही अवैध साहित्य जाळून किंवा नदीत बुडवून नष्ट करण्यात आले असून उर्वरित माल पोलिसांच्या ताब्यात आहे.
ही कारवाई 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पार पडली. या प्रकरणी वसंत केंद्रे यांच्या तक्रारीवरून बिहार आणि उत्तर प्रदेशमधील नऊ तसेच नांदेड जिल्ह्यातील दहा अशा एकूण 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक नदीपात्रात पोहोचले असता तेथे अनेक बोटी, डिझेल, पेट्रोल, तराफे आदी साहित्य सापडले. हे सर्व साहित्य मिळून अंदाजे ₹1 कोटी 39 हजार 400 रुपयांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली.
गुन्हा दाखल झालेल्या नांदेड जिल्ह्यातील वाळू माफियांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
अर्जुन विलासराव क्षीरसागर (वय 30, रा. बोरगाव तेलंग, ता. नांदेड),
शंकर अंबादासराव पवार (वय 32, रा. कोरका),
राजकुमार सोनटक्के (रा. गंगाभेट),
नारायण पुंड (रा. पिंपळगाव),
रामदास क्षीरसागर, पप्पन्ना क्षीरसागर (रा. कलाड),
शिवाजी हंबर्डे (रा. विष्णुपुरी),
पुंडलिक सोनटक्के (रा. वाहेगाव),
कैलास क्षीरसागर आणि बालाजी हंबर्डे.
तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आरोपी पुढीलप्रमाणे :
गणेश लखन जाधव, मुन्ना चौधरी, विलास सहाने, सरोज चौधरी, शिवकुमार बिंद, विजय शंकर सहानी, वकील सहानी, सजीवन बिन, छोटा कबीन.
एकूण 19 आरोपींवर 2025 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वाळू माफियांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, तसेच पोलीस अंमलदार केंद्रे, अर्जुन मुंडे, पचलिंग पवार, कल्याणकर, लव्हारे, पायनापल्ले, चावरे, भिसे, समीर शेख, जमीन शेख, आसिफ, धम्मपाल कांबळे यांच्या पथकाने केली
