नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने राज्यातील एकूण 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांमध्ये पुर आणि अतिवृष्टीने बाधीतांना विशेष मदत व काही सवलती जारी केल्या आहेत. दुर्देवाने त्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव नाही. याचा दोष व्यक्त करतांना नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी शासनाच्या शासन निर्णयाची होळी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने एकूण 36 पैकी 31 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनता त्रासली असा आढावा घेतल्यानंतर 253 तालुक्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. ज्यामध्ये मरण पावणाऱ्या व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये. 40 ते 60 टक्के अपंगत्व आलेल्या लोकांना 74 हजार रुपये, 60 टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 2 लाख 50 हजार रुपये जखमी व्यक्ती एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दवाखान्यात राहिले असतील तर 16 हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षत्त कमी दवाखान्यात राहिले असतील तर 4 हजार रुपये. पुर्णत: नष्ट झालेल्या घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपये आणि डोंगराळ भागातील घरांसाठी 1 लाख 30 हजार रुपये. अंशता: पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार 500 रुपये आणि कच्या घरांसाठी 4 हजार रुपये, झोपडी-8 हजार, गोठा-3 हजार , दुधाळ जनावरे-37 हजार 500, ओढ काम करणारी जनावरे 32 हजार, लहान जनावरे-20 हजार, शेळी/ मेंढी 4 हजार, कोंबडी 10ं0 रुपये, जिरायत पिके 8500, बागायती पिके 17 हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिके 22500, शेत जमीनीचा गाळ काढणे 18 हजार प्रतिहेक्टर, जमीन खरडणे, खचने, शेती वाहुन जाणे, दरड कोसळणे 47 हजार रुपये प्रति हेक्टर, मत्स व्यवसायात काम करणाऱ्या बोटींची अंशत: दुरूस्ती 6 हजार रुपये, पुर्ण दुरूस्ती 15 हजार रुपये, मासे पकडण्याच्या अंशत: बाधीत जाळ्या 3 हजार रुपये. पुर्ण बाधित जाळ्या 4 हजार असे अनुदान दिले आहे. या अनुदानाप्रमाणे शेतकऱ्यांचे काय भले होईल हे माहित नाही. परंतू सरकारने मदतीची प्रक्रिया पुर्ण केली आहे.
मात्र दुर्देवाने शासनाने शासन निर्णयात जाहीर केलेल्या 31 जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव नाही. यावर बाधीत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत शासनाच्या निर्णयाची होळी केली आहे.
संबंधीत व्हिडीओ….
शासनाने पुरग्रस्तांसाठी जाहीर केला निधी पण नांदेडमध्ये जीआरची होळी
