जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत 13 ऑक्टोबर रोजी

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या 16 पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रांनुक्रम नियम, 2025 नुसार ही सोडत घेण्यात येत आहे.
या नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने विशेष सभा आयोजित केली आहे.
जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण नांदेड येथील नियोजन भवन येथे सकाळी11.वा. सोडत होणार आहे. तर पंचायत समिती गटाचे आरक्षण त्या त्या तालुक्यात खाली प्रमाणे होणार आहेत. किनवट सभागृह, तहसिल कार्यालय, किनवट सकाळी-11.00 वा., पंचायत समिती, माहुर कै. वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती, माहुर दुपारी-03.00 वा. , पंचायत समिती, हदगांव पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, हदगांव सकाळी-11.00, पंचायत समिती, हिमायतनगर सभागृह, तहसिल कार्यालय, हिमायतनगर दुपारी-03.00 वा. , पंचायत समिती, नांदेड उपविभागीय अधिकारी, नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, नांदेड सकाळी-11.00 वा. , पंचायत समिती, अर्धापूर सभागृह, तहसिल कार्यालय, अर्धापूर दुपारी-03.00 वा. , पंचायत समिती, भोकर उपविभागीय अधिकारी, भोकर यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, भोकर सकाळी-11.00 वा., पंचायत समिती, मुदखेड सभागृह, तहसिल कार्यालय, मुदखेड दुपारी-03.00 वा., पंचायत समिती, धर्माबाद बैठक कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, धर्माबाद सकाळी-11.00 वा. ,पंचायत समिती, उमरी तहसिल सभागृह (नवीन), तहसिल कार्यालय, उमरी दुपारी-03.00 वा.,पंचायत समिती, बिलोली पंचायत समिती सभागृह, बिलोली ता. बिलोली सकाळी-11.00, पंचायत समिती, नायगांव खै. तहसिल कार्यालय, नायगाव खै.दुपारी-03.00 वा.,पंचायत समिती, कंधार सभागृह, तळमजला, तहसिल कार्यालय, कंधार सकाळी-11.00 वा.,पंचायत समिती, लोहा तहसिल कार्यालय, लोहा दुपारी-03.00 वा.,पंचायत समिती, देगलूर पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, देगलूर सकाळी-11.00 वा.,पंचायत समिती, मुखेड बैठक कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड दुपारी-03.00 वा. याकरिता सोडत पद्धतीने कारवाई करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, संबंधित अधिकारी, प्रतिनिधी आणि जनतेने या सोडतीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!