नांदेड(प्रतिनिधी)-एका घरफोडी प्रकरणातील आरोपीला पकडून सोनखेड पोलीसांनी चोरीच्या 28 हजार रुपयांपैकी 15 हजार 100 रुपये जप्त केले आहेत. दि.1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी मौजे टेळकी ता.लोहा येथे चंद्रकलाबाई प्रकाश कसबे यांच्या घरात चोरी झाली होती. सोनखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 193/2025 दाखल होता. पोलीसांनी या प्रकरणातील आरोपीचे नाव शोधले. तो टेळकी येथील निलेश आनंदा हनवते (26) असा आहे. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून चोरी गेलेल्या 28 हजार रुपयांपैकी 15 हजार 100 रुपये जप्त केले आहेत. ही कार्यवाही इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पोलीस अंमलदार गणपत गिते, वामन नागरगोजे यांनी पुर्ण केली. Post Views: 1,169 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation 30 लाखांची चोरटी वाळू घेवून जाणारी हायवा पकडली नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जुगार पकडले