एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपले सर्व दौरे रद्द केले असून, ते सध्या ‘फुल फॉर्म’मध्ये आहेत. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले एक सूचक विधान आहे. “अभी तो पिक्चर बाकी है।”याच वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एकाच दिवशी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भेट दिली होती. या भेटीवर आधी फारसा गाजावाजा झाला नव्हता, मात्र एनडीएच्या बैठकीनंतर या मुद्द्याला पुन्हा जोर मिळाला आहे. आता चर्चेचा मुद्दा असा आहे की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पाठोपाठ राष्ट्रपतींचीही ‘बिदाई’ होणार आहे का?

एके काळी अटल बिहारीजी वाजपेयी यांना बाजूला करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा वापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला होता. आता त्याच पद्धतीने मोदींना बाजूला करण्यासाठी संजय जोशी यांच्या नावाचा प्रचार सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने या संघशक्तीच्या डावावर उलट चाल खेळत स्पष्ट केले आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार नाही.

मात्र हा राजकीय ‘खेळ’ कुठे थांबणार? हा फक्त डावपेच आहे की बुद्धिबळातील ‘शह-मात’ याची तयारी? सूत्रांनुसार, सोमवारी अमित शहा यांनी आपल्या कार्यालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी असा नेता निवडायचा आहे, जो संघाशी घनिष्ठ संबंध ठेवणारा आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष, संघटन सचिव बी.एल. संतोष, महासचिव विनोद तावडे आणि सुनील बंसल यांचाही सहभाग होता. यात आगामी निवडणुकींची रणनीतीही ठरवण्यात आली.मात्र, प्रश्न असा आहे की जर हा विषय केवळ भाजप आणि संघ यांच्यातील असेल, तर एनडीएतील इतर घटक पक्षांची बैठक का बोलावण्यात आली?

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमधून हे स्पष्ट होते की काहीतरी मोठं घडणार आहे. नवभारत या दैनिकाने यासंदर्भात बातमी दिली आहे की, नरेंद्र मोदी यांनी आपला उत्तराधिकारी निश्चित केला आहे, आणि तो म्हणजे अमित शहा.त्याच वेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यात आले असून, संपूर्ण राजकारणाची ‘बाल्कनी’ सध्या हादरत आहे. एनडीएच्या बैठकीत मोदींचा सन्मान अशा पद्धतीने करण्यात आला, जसा एखाद्या निरोप समारंभात केला जातो.

जरी मोदींनी “उत्तराधिकारी” असा शब्द वापरला नाही, तरी त्यांनी स्पष्टपणे अमित शहा यांचे नाव घेत, त्यांना हिरवा कंदील दाखवल्याचे संकेत दिले. मोदी म्हणाले, “ही तर सुरुवात आहे, अजून पुढे जायचं आहे.”
पण याच ‘पुढे जाण्याच्या’ शर्यतीत, राष्ट्रपतींना मागे सारण्याचा डाव आहे का?ज्येष्ठ पत्रकार अभय दुबे म्हणतात की, एकाच दिवशी राष्ट्रपतींना पंतप्रधान आणि गृहमंत्री भेटायला जाणे, ही काही साधी बाब नाही. त्यामागे गंभीर राजकीय विचार आणि आखणी असते. त्यांच्या मते, प्रथम नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना राजीनाम्यासाठी मनवायला गेले, आणि त्यानंतर अमित शहा त्याच निर्णयावर शिक्कामोर्तब करायला गेले.जर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर पंतप्रधान मोदींसाठी एक नवीन मार्ग मोकळा होईल, आणि भारतीय जनता पक्षावर संघाचा असलेला दबाव एकाच झटक्यात संपेल.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर राजीनाम्यांची मालिका सुरु झाली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला, त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना राजीनामा देण्यास सांगितले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. याच दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी यांनीही आपल्या कंपनीतील कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, गौतम अदानी मुळे डोनाल्ड ट्रम्पसारखी आक्रमक धोरणे राबवली जात असून, त्याविरोधात नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे.अदानी यांनी राजीनामा दिल्याचा अर्थ असा की, ते आता कंपनीचे मुख्य प्रबंधक राहणार नाहीत. याचवेळी, अमेरिकेने अदानी समूहावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत, त्यामुळे पुढील काही तासांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

‘नवराटाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, अमित शहा यांनी बिहार दौऱ्याच्या तारखा बदलल्या असून, ते आता ७ ऐवजी ८ ऑगस्टला येथे जाणार आहेत.दुसरीकडे, राहुल गांधींनी संपूर्ण विरोधी पक्षांची बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली आहे. त्यांचा हेतू उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला अधिक नाट्यमय व निर्णायक बनवण्याचा आहे.

आता मुख्य प्रश्न उभा राहतो की –
उपराष्ट्रपती पदासाठी आरएसएस आणि भाजपमध्ये अंतिम टक्कर होणार आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती बनण्याच्या तयारीत आहेत का?वाचकांनी यावर गंभीरपणे विचार करायला हवा, नेमकं भारतात काय चाललं आहे?

