नांदेड(प्रतिनिधी)-श्री रामजन्मोत्सव समिती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती हडको, महाआरती संघटना यांच्यावतीने दि.6 ऑगस्ट रोजी सिडको येथील सिध्देश्र्वर महादेव मंदिरापासून एक कावड यात्रा निघणार आहे. या कावड यात्रेचे समापन गोदावरी नदीकाठी असलेल्या उर्वशी महादेव मंदिरात होणार आहे.
श्रावण महिना हा पवित्र महिना समजला जातो. या महिन्यादरम्यान अनेक सण येतात. त्यात भगवान महादेवाची पुजा अर्चा यांना विशेष महत्व आहे. तसेच कावड यात्रेला सुध्दा खुप महत्व आहे. यंदा 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सिध्देश्र्वर महादेव मंदिरपासून ही कावड यात्रा निघणार आहे. यंदाच्या कावड यात्रेत कावड 51 फुट लांब असेल. या यात्रेचे प्रमुख आकर्षण बाहुबली भगवान बजरंगबलीचा देखावा असणार आहे. शिवभक्तांनी व हिंदुबांधवांनी या कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी आवाहन श्री रामजन्मोत्सव समिती नांदेड, श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको-हडको यांच्यावतीने करण्यात आले आहे.
6 ऑगस्ट रोजी सिडको ते उर्वशी मंदिर कावड यात्रा
