नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात एक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बदलून जात आहे. तर एक नांदेडला येत आहे. तसेच नांदेड येथून दोन तहसीलदार जात आहेत आणि दोन तहसीलदार येत आहेत. महसुल व वन विभागाने हे आदेश काल जारी केले आहेत.
कंधार येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांना उपजिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी परभणी या पदावर पाठविले आहे. तसेच वर्धा येथील उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांना नांदेड येथे विशेष भुसंपादन अधिकारी लसीका या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
नांदेडचे उमरी येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांना लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे पाठविण्यात आले आहे. तर रेणापुर येथील तहसीलदार मंजुषा भगत यांना उमरी येथे तहसीलदार पदी नियुक्ती देण्यात आली आहे. धाराशिव येथील तहसीलदार अभिजित जगताप नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील तहसीलदार झाले आहेत.
नांदेड येथून एक उपजिल्हाधिकारी जाणार एक येणार; दोन तहसीलदार जाणार एक येणार
