नांदेड :- आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी डेंग्यू उद्रेक गावं टाकराळा प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम ता. हिमायतनगर येथे डेंग्यू रूग्णास भेट देऊन पाहणी केली व गावातील ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी यांना कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धुरफवारणी, अळीनाशक औषधी फवारणी, नाल्या गटार वाहती करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गावात साथ आटोक्यात येई पर्यंत वैद्यकीय पथक कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड,डॉ नखाते वैद्यकीय अधिकारी सरसम व संजय भोसले जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक, शंकर मलदोडे किटक समहारक, प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा उपस्थित होते..
More Related Articles
पत्रकार संघांच्या पदाधिकारी नियुक्त्या कधी करता अध्यक्ष संतोषजी पांडागळे साहेब
नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकार संघाचे अध्यक्ष कसे नियुक्त झाले यापेक्षा ते नियुक्त झाले हे खरे आहे. परंतू त्यांच्या…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
नांदेड- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी पालकमंत्री…
संविधान समर्थन मोर्चाच्या तयारीसाठी भोकर, हिमायतनगर येथे बैठक संपन्न
नांदेड- बोढार आणि परभणी येथील आंबेडकरी तरुणाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी.…
