सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी सुमंत भागेची नियुक्ती SC -ST समाजासाठी अन्याय कारक

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी सुमंत भागे यांची नियुक्ती झाल्या नंतर SC -ST साठी असणाऱ्या सुविधा हळू हळू कमी करत आता बंद केल्या आहेत. त्यामुळे एस सी – एस टी जमातीचे भविष्य अंधाराकडे जाणार आहे. वाचकांसाठी उत्तम वानखेडे यांनी लिहलेले लिखाण प्रसिद्ध करीत आहोत.

आपण सर्वांना माहितीसाठीच नाही, पण आवाज उठविण्याचे आव्हान पण करीत आहे,* *एक SC -ST द्वेष करणारा जातीवादी सुमंत भांगे हा SC / ST च्या पुढच्या सपूर्ण पिढी बरबाद करू शकतो हे जिवंत उदाहरण आहे. हातावर हात टाकून बसू नका, किंवा ज्यांनी शिक्षण आणि आरक्षण घेऊन आर्थिक संपन्नता मिळवली त्यांनी तो-यात वागू नका, SC/ST च्या येणाऱ्या पिढ्यान्चे भविष्य संपविले आहे. शिक्षणाला कायमचा लगाम केंद्र सरकारने लावला आहे.SC/ST ला मिळत असलेली बार्टीची फेलोशिप जातीवादी सचिव सुमंत भांगेने पूर्णतः बंद केली, कालच याविषयीचे वृत्त हाती आले. आणि आम्ही प्रत्यक्ष बार्टि महासंचालक यांच्येशी संपर्क केला, तेव्हा हे सत्य असल्याचे समजले. आता तुमचे मुला मुलींना उच्चशिक्षित तरच काय पण पदवीधर आणि त्यानंतर विद्यालयिन पण शिक्षण घेऊ शकणार नाही. आताच जागे व्हा, अन्यथा.मरा पटापट..

गम्मत सुरू झाली काही दिवस अगोदर आंबेडकरी समाजाचे बार्टिचे 30 प्रशिक्षण केंद्र होते . त्यामध्ये 50000 अनुसूचित जाती – जमातीचे विद्यार्थी तेथे प्रशिक्षण घेत होते . अनुसूचित जाती- जमातीच्या विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळत आहे आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत असल्याचे अनेकांना खुपले आणि तो डाव रचून सचिव सुमंत भांगे यांनी सर्व प्रशिक्षण कार्यक्रम बंद पाडले. सचिव सुमंत भांगे यांच्या दलित द्वेषापोटी त्यांनी दादागिरीने दलितांचे सर्व प्रशिक्षण बंद पाडले. आणि SC/ST चा गेम केला. विद्यार्थी ट्रेनिंग साठी राज्यातच्या माध्यमाने फेलोशिप साठी आणि प्रशिक्षणासाठी 3 संस्था कार्यान्वित आहेत, सारथी,महाज्योती,आणि बार्टी.

 

सारथी मधून OPEN साठी योजना असतात.महाज्योती मधून OBC साठी तर बार्टी मधून SC/ST साठी. यात फक्त SC/ST च्या सर्व योजना बंद करण्यात आलेल्या आहेत. भांगे हा सामाजिक न्याय विभागाचा सचिव आहे. परंतु त्याला SC/ ST लोकांविषयी प्रचंड द्वेष असल्याचे स्पष्ट झाले. आहे. तो तर मोहरा आहे , त्याच्या माध्यमातून सरकारचा खरा चेहरा समोर येतो . आणि आपले केंद्रीय समाज कल्याण मंत्री दिल्लीत बसून कविता रचून आपले पद कायम ठेवत रूपात गोडवे गात आहे. SC तसेच S T समाजाच्या विरोधात एवढी ओपन दादागिरी करण्याची हिम्मत करणारा सुमंत भांगे हा पहिला अधिकारी आहे . काल आलेल्या वृत्ता नुसार सारथी आणि महाज्योतीची फेलोशिप वाढविली असून बार्टीची फेलोशिप संपूर्ण बंद केली. म्हणजे SC / ST प्रवर्गाला जिवंतपणीच मारून टाकले , आता जागे व्हा, नाही तर तुमच्या लेकरांचे सरण रचून ठेवा. पहा काय विचार करताय ते शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, जागे व्हा, जागे व्हा,

लेखक –

उत्तम वानखडे

जेष्ठ पत्रकार आणि संपादक ib7news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!