नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
मौजे शिबदरा ता.हिमायतनगर येथील संजय दत्तलाल जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान ते त्यांची पत्नी आणि मुले घरास कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे 86 हजार रुपयांचे आणि 40 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 171/2025 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक माने हे करीत आहेत.
हिमायतनगरमध्ये 1 लाख 26 हजारांची चोरी
