नांदेड,(प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वीच बदली झालेल्या दोन पोलीस उपाधीक्षकांना नवीन जागी बदलून नवीन नियुक्ती दिल्या आहेत एकाची बदली करण्यात आली आहे. यामध्ये नांदेडच्या रिकाम्या उपविभाग बिलोली येथे पोलीस उप अधीक्षक शाम सुदाम पानेगावकर यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य शासनातील गृह विभागाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्ण सावंत यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या आदेशानुसार गडचिरोली येथे नियुक्ती मिळालेले समीर सज्जनसिंग मेहेर यांना बदलून पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पाठवले आहे. तसेच श्याम सुदाम पानेगावकर यांना काही दिवसापूर्वी मालेगाव कॅम्प नाशिक ग्रामीण येथे नियुक्ती मिळाली होती आता त्यांची ती नियुक्ती बदलून त्यांना नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर पाठवले आहे. तसेच जवाहर जिल्हा पालघर येथील पोलीस उप अधीक्षक गणपत दिनकर पिंगळे यांना मीरा-भाईंदर-वसई- विरार येथे सहायक पोलीस आयुक्त या पदावर पाठवण्यात आले आहे.
