नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला व्याजाने दिलेले पैसे परत घेवून त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडून पुन्हा 1 लाख रुपये मागण्यात आले. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जुना कौठा येथे राहणारे ऍटोचालक बालाजी रवि सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता अनिकेत प्रकाश ढगे, विक्की जोंधळे, चंद्रकांत लक्ष्मण मनोरवार आणि प्रेम सुनिल कांबळे यांनी त्याला पळवून नेले, पावडेवाडी व डॉक्टरलाईनमध्ये कदम हॉस्पीटलजवळ त्याला मारहाण केली. या लोकांकडे कोणताही सावकारी परवाना नसतांना त्यांनी व्याज कमावण्यासाठी मला दिलेले पैसे परत घेतले आणि 1 लाख रुपयांची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिली. भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 422/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक केजगिर अधिक तपास करीत आहेत.
युवकाचे अपहरण करून 1 लाखांची मागणी गुन्हा दाखल
