नांदेड(प्रतिनिधी)-पळसा ता.हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच मौजे खुपसरवाडी येथील हनुमान मंदिर येथील 7 हजार रुपये किंमतीची पितळी घंटा तीन चोरट्यांनी चोरून नेली आहे. यामध्ये सीसी कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांचा दुचाकीचा नंबर सापडला आहे.
दिलीप बाबुराव थाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जुलैच्या सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान ते शेताच्या कामाला गेले. वडील ड्युटीला गेले आणि आई घर बंद करून कुलूप लावून उपचारासाठी बरडशेवाळा येथे दवाखान्यात गेल्या. त्यानंतर कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या कडीचा कोंडा स्कु्रने काढून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे चैन, मंगळसुत्र आणि रोख रक्कम असा 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मनाठा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 147/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस हवालदार दाडे अधिक तपास करीत आहेत.
खुपसरवाडी येथील दत्ता व्यंकटी पातारपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जुलैच्या रात्री 1.10 वाजेच्यासुमारास मौजे खुपसरवाडी येथील हनुमान मंदिरात दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.एस.4118 यावर बसून तिन चोरटे आले आणि त्यांनी मंदिरातील 7 हजार रुपये किंमतीची पितळी घंटा चोरून नेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 696/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
पळसा ता.हदगाव येथे घरफोडले ; खुपसरवाडी ता.नांदेड येथे मंदिराची घंटा चोरली
