नांदेड जिल्हामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आप स्वबळावर लढणार..

नांदेड –नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी व शहर कार्यकारिणी च्या वतीने येत्या काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका ह्या स्वबळावर लढविण्याची भुमिका ही लोकसभा,विधानसभा निवडणुका मध्ये इंडिया आघाडी चा आप ला आलेला अनुभवामुळे घेतली असून हा निर्णय आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्यांचे प्रभारी मा.आ.प्रकाश जरवाल, महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी चे कार्यकारी अध्यक्ष श्री अजीत फाटके संघटन मंत्री संग्राम घाटगे सचिव वैजनाथ राठोड यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी ने घेतली असून यासाठी नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने पक्षसंघटन मजबूत करून नांदेड येथील जनतेला पर्याय देण्याची भुमिका घेतली आहे अशी माहिती नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष अँड जगजीवन भेदे जेष्ठ नेते नरेंद्र सिंग ग्रंथी शहराध्यक्ष प्रा.देविदास शिंदे जिल्हा सचिव डॉ अवधूत पवार, संग्राम गिते, बालाजी नागेश्वर यांच्या सह असंख्य कार्यकर्ते यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!