नांदेड(प्रतिनिधी)-आयटीआयजवळच्या सिव्हील मॅटरचा चेंडू आता शहाजी राजांच्या दरबारात पोहचला आहे. या प्रकरणातील महिलेने बोगस व बनावट मृत्यू पत्र बनवून जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यात पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक नागोराव कुंडगिर यांचेही नाव अर्जात समाविष्ट आहे.
आयटीआय जवळच्या 22 हजार 400 चौरसफुट भुखंडावर 10 जुलै 2025 च्या रात्री 3.30 वाजता जुने पत्रे काढून नवीन पत्रे ठोकण्याचा प्रकार घडला. या जागेच्या मालकातील वारसदार लता हेमंत मेहता या पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गेल्या असतांना त्यांना सांगण्यात आले की, हे सीव्हील मॅटर आहे म्हणून कोणीच तेथे येणार नाही असे सांगितले. पण उपलब्ध असलेल्या व्हिडीओप्रमाणे त्या ठिकाणी पोलीसांची गाडी उभी होती, पोलीसही उभे होते आणि त्यातच तेथे जुना ताबा काढून नवीन ताबा ठोकण्यात आला. बहुदा यालाच म्हणतात सीव्हील मॅटर कारण तेथे असलेले जुने पत्रे काढले जात होते. हा व्हिडीओ पाहुन ऍड.सय्यद आरबोद्दीन यांनी सांगितले की, या घटनेला कायद्याच्या भाषेत चोरीच असे म्हणतात.
10 तारेखाला हा प्रकार घडला. 11 तारखेला बहुदा महिलेने पोलीस अधिक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांची भेट झाली नसेल. त्यानंतर 12-13 जुलै हे दोन दिवस सुट्टी होती. म्हणून लता हेमंत मेहता यांनी 14 जुलै रोजी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. ज्यामध्ये बोगस व बनावट मृत्यूपत्र बनवून माझ्या मालकीच्या व ताब्यातील जमीनीला हडप करणाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. लता मेहता यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे सर्व्हे नंबर 61 बी बाबत ते मृत्यू आहे. परंतू ते सुध्दा खोटेच आहे. माझ्या ताब्यात असलेली जमीनी सर्व्हे नंबर 61 बी 2 अशी आहे. या संदर्भाने सुध्दा बरेच वाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामधील एका प्रकरणात माझे सासरे चंद्रकांत मेहता यांनी ती जागा दोषी यांना नोंदणी करून देण्यास सांगितले होते. सासरे चंद्रकांत मेहता यांनी 61 बी बद्दल बनवलेले मृत्यूपत्र खोटेच आहे. ज्याच्या आधारावर अतिक्रमण करणारी मंडळी 61 बी 2 वर अतिक्रमण करत आहे. 10 जुलै च्या पहाटे 3.30 वाजता बालाजी ईबितदार व त्यांचे सहकारी माझ्या जागेवर आले. या सर्वांनी पोलीसांची गुप्त मदत घेवून माझ्या जागेवर असलेला नावाचा बोर्ड, टीनपत्रे, लोखंडी पाईप चोरून नेले आहे. त्या रात्री पोलीसांनी मला मदत केलेली नाही. या प्रकरणात पोलीस दलातील व्यक्ती नागोराव कुंडगिर यांच्यासहकाऱ्यानेच हे घडविण्यात आले आहे. घेतलेल्या माहितीनुसार नागोराव कुंडगिर हे सध्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत तेही अत्यंत नामांकित व्यक्तीमत्व आहेत. न्यायालयातील दावा क्रमांक 57/2011 चा आदेश, जागेचे ताबा असलेले फोटो, सर्व्हे नंबर 61 बी 2 ची 7/12 व रजिस्ट्री विरोधकांनी, विरोधकांनी बोगस तयार केलेले कागदपत्र आणि सामान चोरून नेतांनाचा व्हिडीओ लता मेहता यांनी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना दिला आहे. या सीव्हील मॅटरचा शोध आता योग्य दिशेने होईल अशी अपेक्षा लता हेमंत मेहता यांना आहे.
संबंधीत बातमी…
काल सिव्हील मॅटर असलेला प्रकार खरे तर भुखंड माफीयांचा सुळसुळाट
