नांदेड– आज रोजी मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन कार्यालय देगलूर नाका येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी सर्वानुमते “जयहिंद ऑटो सेना”स्थापन घोषित केले आहे जी एनजीओच्या माध्यमातुन चालविण्यात येणार असून. मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील एन जी ओ अंतर्गत चालणारी ऑटो संघटना ही प्रथम असून ह्या संघटनेचे कार्य आणि पार पडलेले व करीत असलेले ऑटो संघटनेचे कार्यक्रम हे वेबसाइट वर झळकणार असून ती वेबसाइट हा जगातील प्रत्येक व्यक्तीला पहावयास मिळणार असून कार्य करणारा ऑटो चालक वेबसाईट वर दिसणार आहे यामुळे याचे राज्यात प्रथम नांदेडला बहुमान मिळणार असल्याचे पठाण यांनी आपले मत मांडले आहेतः
आज 14 जुलै 2025 रोजी ” जयहिंद ऑटो सेना” स्थापन करून मोहम्मद साजिद राज यांना जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे तर मोहम्मद हाफिज संघटक. मोहम्मद सिराज उत्तर शहर प्रमुख. नवाझखान दक्षिण प्रमुख. हारून अलीखा सचिव. शहाबुद्दीन कोषाध्यक्ष. सय्यद अजीज सदस्य. खाजा खान जनरल सेक्रेटरी. मोहम्मद साबेर सदस्य. अब्दुल बासिद दक्षिण संघटक. आसिफ खान उपाध्यक्ष. शेख इसाक दक्षिण उपाध्यक्ष. अब्दुल बशीर उत्तर उपाध्यक्ष. मोहम्मद तारिक खान सदस्य पदी यांच्या निवड करण्यात आली असून यावेळी नव नियुक्त जिल्हा प्रमुख मोहम्मद साजिद राज यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शन ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी केले आहे तर सूत्र संचालन एसटी महामंडळाचे सेवा निवृत चालक राज मोहम्मद यांनी उपस्थित सर्व ऑटो पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत ऑटो सेवा विषयी माहिती दिलेली आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थेचे भारत सरकार एनजीओ सदस्य डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी म्हटले की शहराची सुरुवात ही ऑटो चालकापासून सुरुवात होते जो राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रवासी हा प्रथम ऑटो रिक्षा चालकाकडे येतो आणि त्याच्या ठिकाणी नेऊन सोडण्यास तो संपर्क करतो म्हणजे अर्थात सर्वात पहिले तो ऑटो चालकाला पसंती दर्शवितो त्यामुळे ऑटो चालकांनी प्रामाणिकपने सेवा देण्याचा विचार करावा कारण तो आपला देवरूपी ग्राहक असतो याचे भान ठेवावे. ज्यामुळे ग्राहकाला आनंद मिळतो तिचं आपली शिदोरी असुन त्यातच आपले चांगले कर्म केल्याचा आनंद मिळतो हा योग सर्वांना मिळत नाही तर तो भाग्य ऑटो चालकांचे असते. ही एक सेवा आहे.
जयहिंद ऑटो सेना पदाधिकारी यांना ओळखपत्र देऊन त्यांना चालक असेल तर खाकी शर्ट व मालक असेल तर पांढरा शर्ट देण्यात येईल आणि पासिंगसाठी जाणाऱ्या ऑटोना फ्री मध्ये रेडियम लावून देण्यात येईल. आणि भविष्यात या एनजीओच्या माध्यमातुन ऑटो चालकाना भौतिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहेः. तर 15 ऑगस्ट रोजी शहराच्या चारही बाजूंनी रेल्वे स्टेशन पर्यंत मोफत प्रवास देण्याचे ठरविले असून वयोवृध्द महिला पुरुषांना घरापर्यंत पोहचविणे ही जयहिंद ऑटो सेनेची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यावेळी 15 ऑगस्ट रोजी वजीराबाद वाहतूक पोलिस निरीक्षक गुट्टे यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन शहरात मार्गस्थ ऑटो चालक होतील असे स्पष्ट करण्यात आले आहेत. आणि लवकरच ऑटो चालकाना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी म्हटले असून. नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले आहेत.
