नांदेड(प्रतिनिधी)-पेरणीसाठी ठेवलेले 18 हजार रुपये किंमतीचे हरभरा बी दोन चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे.
मारोती शंकर बोडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलै रोजी 12 वाजेच्यासुमारास आरळी गावातील त्यांच्या शेडमधून संदीप शंकर घोडके (30) आणि अंकुश महादेव बोडके (26) दोघे रा.आरळी ता.बिलोली यांनी मारोती बोडके यांचे पेरणीकरीता ठेवलेले हरभरा बी 18 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. बिलोली पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 190/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक तिडके अधिक तपास करीत आहेत.
पेरणीसाठी ठेवलेले हरभरा बी चोरले
