नांदेड(प्रतिनिधी)-सिडको येथील एलआयसी कार्यालयाजवळ 22 जून रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास एका 76 वर्षीय व्यक्तीला आपण पोलीस असल्याचे सांगून दोन जणांनी त्यांचे 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे लंपास केले आहे.
बाळकृष्ण नारायण येरगेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर कल्याण सोसायटी सिडको येथे आहे. 20 जून रोजी ते आपल्या स्कुटीवरून जात असतांना एलआयसी कार्यालय सिडको रस्त्यावर दोन जणांनी त्यांची स्कुटी थांबवून आम्ही पोलीस आहोत वातावरण खराब आहे असे सांगून त्यांच्याकडील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी 15 हजार रुपये किंमतीची, सोन्याची रुद्राक्ष माळ 45 हजार रुपये किंमतीची काढून घेवून दस्तीत बांधून देतो म्हणून बाळकृष्ण येरगेवार यांची नजर चुकवून, त्यांची फसवणूक करून घेवून पळून गेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 649/2025 नुसार दाखल केली असून पोलीस अंमलदार मोरे अधिक तपास करीत आहेत.
तोतय्या पोलीसांनी 76 वर्षीय व्यक्तीची 60 हजारांची फसवणूक केली
