नांदेड(प्रतिनिधी)-सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर भाग्यनगर पोलीसांनी त्या महिलेची ओळख पटवून तिची तक्रार घेतली आणि ऍटो चालकाविरुध्द 24 तासात महिलेच्या विनभंगाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
5 जुलै रोजी एका ऍटोमध्ये महिलेची छेडछाड करून तिच पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार गजानन किडे, विशाल माळवे, नागेश वाडीयार, धनंजय कुंबरवार, सविता केळगेंद्रे, गंगुलवार आणि गुट्टे यांनी शेख इमरान शेख हारुनसाब (24) रा.नईअबादी नांदेड यास ताब्यात घेतले. पोलीसांनी ऍटो क्रमांक एम.एच.26 एन.5057 हा ताब्यात घेतला. भाग्यनगरच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अनुपमा केंद्रे यांनी गुन्हा क्रमांक 390/2025 चे दोषारोपत्र 16 तासात न्यायालयात सादर केले.
महिलेचा विनयभंग करणाऱ्या ऍटो चालकाविरुध्द 16 तासात दोषारोपपत्र दाखल
