नांदेड :- कृषी विभागामार्फत नांदेड तालुक्यातील मौजे ढोकी येथे सोयाबीन पिकाचे महिलांचे विनाअनुदानित शेती शाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या शेतीशाळेत ढोकी या गावात विना अनुदानित, उपरोक्त विनाअनुदानित सोयाबीन शेतीशाळा कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांची उपस्थित होती.
शेतीशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या शेतीशाळेत सध्याच्या हवामान बदलामुळे सोयाबीन पिकावर होणाऱ्या परिणामांविषयी, तसेच कीड-रोग व्यवस्थापन या विषयी शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती.
ज्यात महिला आणि पुरुष शेतकरी दोन्ही सहभागी झाले होते. हा या शेतीशाळेचा दुसरा वर्ग होता आणि तो यशस्वीरित्या पार पडला.
शेतीशाळेत आयपीएम (IPM) / आयसीएम (ICM) निरीक्षणे: शेतकऱ्यांच्या गटांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिसंस्थेचा (Crop Ecosystem) अभ्यास केला. या अभ्यासात पिकांवरील कीड आणि रोगांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणांवर गटांमध्ये सखोल चर्चा घडवून आणण्यात आली, ज्यामुळे शेतकऱ्यांनी एकमेकांचे अनुभव आणि ज्ञान वाटून घेतले. चर्चेअंती निष्कर्षांवर आधारित फवारणीविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले, जेणेकरून शेतकरी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने फवारणी करू शकतील. सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीः शेतकऱ्यांना निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क यांसारखे घरगुती आणि सेंद्रिय कीटकनाशके कसे तयार करावेत, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. हे पर्यावरणासाठी अनुकूल असून रासायनिक फवारणीचा वापर कमी करण्यास मदत करते.
सदर शेती शाळेमध्ये शेतकरी गटे आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करणे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क इत्यादी जैविक निविष्ठा तयार करण्यासाठी गाव स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र स्थापना करणे, ऊस पिकाचे पाचट व्यवस्थापन, फळबाग लागवड क्षेत्रात वाढ करणे, होस्ट फार्मरचे शेतावर पक्षी थांबे,पिवळे निळे चिकट सापळे, जैविक निविष्ठाचा वापर, जास्तीत जास्त शेतकऱ्यांची वाट गाव स्तरीय व्हाट्सअप ग्रुप मध्ये समावेश करणे, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानासाठी महाविस्तार ॲप्स वापर करणे, पाणी फाउंडेशन डिजिटल शेती शाळाचा लाभ घेणे इत्यादि विषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी मार्गदर्शन केले .
सांघिक खेळः शेवटी, ‘पावसाची टाळी’ या सांघिक खेळाने शेतीशाळेची सांगता करण्यात आली, ज्यामुळे महिला शेतकरी व शेतकऱी बांधवांत एकोपा आणि उत्साह निर्माण झाला.
या शेतीशाळेला कृषी विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषी अधिकारी श्री. तवर , उप कृषी अधिकारी श्री. नागुरे , सहाय्यक कृषी अधिकारी -श्रीमती मोरताडे यांची उपस्थिती होती. या शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींबद्दल माहिती मिळाली असेल, ज्यामुळे त्यांची शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत होते..!!
