नांदेड,(प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोरटी वाळू भरलेला एक टिप्पर पकडला आहे. त्यात एकूण चार लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार आप्पाराव दशरथ वरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी पोलिसांना कापशी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर गस्त करत असताना, त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर असलेल्या कॅनॉल मधून चोरटी रेती वाळू काढून वाहतूक होत आहे. तेथे जाऊन तपासणी केली असता तेथे एम एस 26 एच 7218 क्रमांकाचा एक टिप्पर सापडला.त्यात असलेल्या वाळू संदर्भाने विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही म्हणून उस्मान नगर पोलिसांनी संभाजी आत्माराम जाधव (30) टिप्पर चालक आणि ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (35) दोघे राहणार चिंचोली तालुका लोहा यांच्याविरुद्ध गुन्हा: क्रमांक 120/2025 दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर गाडेकर, पोलीस अंमलदार सुशील कुबडे, नामदेव रेजितवाड, आप्पाराव वरपडे, पवार, कांबळे यांनी ही कार्यवाही केली. कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी या कार्यवाहीसाठी उस्मान नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.
More Related Articles
वसंतरावजी के कार्य को हमेशा याद किया जायेगा-खा.राहुल गांधी
नांदेड, दि.५ (प्रतिनिधी)-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खा.मल्लिकार्जुन…
नांदेड ग्रामीण पोलीसांनी 40 लाखांची गाडी आणि 20 हजारांची अवैध वाळू पकडली
नवीन नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी पिंपळगाव निमजी शिवारात रात्री 10 वाजेच्यासुमारास एक 40…
स्थानिक गुन्हा शाखेने 10 किलो गांजा पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नागेली ता.मुदखेड शिवारात एका शेतात पिकवलेला गांजा हा अंमली पदार्थ स्थानिक गुन्हा शाखेने छापा…
