ड्रीमलाइनर अपघात : अमेरिकेचा कबाड भारतात का?

सेवानिवृत्त वायुदल अधिकारी अरुप राहा यांनी शनिवारी एका समारंभात बोलताना सांगितले की १२ जून रोजी ‘७८७ ड्रीम लाइनर’ या विमानाचा अपघात झाला. या अपघाताबाबत बोलणे अतिशय वेदनादायक आहे. जे लोक या घटनेला आतंकवादी कट किंवा अंतर्गत षडयंत्र असल्याचे सांगतात, ते पूर्णपणे चुकीचे वाटते.

 

या अपघातात विमानाच्या इंजिनला आवश्यक ती ऊर्जा मिळाली नाही, किंवा ती ऊर्जा पुरवणारा स्रोतात कुठेतरी अडथळ्यामुळे प्रभावित झाला. विमान उंची गाठण्यात असमर्थ ठरले. या स्थितीला वैमानिक भाषेत “थ्रस्ट” न मिळणे असे म्हणतात. या मागे इंधनात भेसळ, सॉफ्टवेअर त्रुटी किंवा नियंत्रण प्रणालीतील बिघाड कारणीभूत असू शकतो. मात्र, या दुर्घटनेत ना तोडफोड झाली, ना पक्षी विमानाला धडकला, असे स्पष्टपणे राहा सांगत होते.

 

आपल्याला DGCA च्या अधिकृत अहवालाची वाट पाहणे गरजेचे आहे. मी एव्हिएशन क्षेत्राशी संबंधित आहे आणि या यंत्रणांचा सखोल अभ्यास केला आहे. माझ्या मते ही चूक इंजिनसंबंधी आहे. पायलटने मेडे कॉल दिला होता आणि त्याआधी सतत सांगत होता की ‘थ्रस्ट’ मिळत नाही, विमानाला आवश्यक ती ताकद मिळत नाही आहे. परिणामी, विमान उंची गाठू शकले नाही आणि एका इमारतीवर जाऊन कोसळले. विमानातील एक व्यक्ती वाचला. बाकी सर्वांचा मृत्यू झाला. अद्यापही घटनास्थळी मृतदेह सापडत आहेत आणि मृतांची संख्या स्पष्ट होणे सुरू आहे.

 

‘बोईंग’ कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे ४० टक्के आहे, तर अपघातांमध्ये त्याचा वाटा सर्वाधिक तर एअर बसचा जवळपास ६० टक्के आहे. विशेषतः ‘ड्रीमलाइनर’ विमानांबाबत आम्ही यापूर्वीही गंभीर चर्चा केली आहे. खुद्द ‘बोईंग’ कंपनीतील अभियंत्यांनी गुणवत्ता कमतरतेबाबत तक्रारी केल्या आहेत. अमेरिकन सरकारने या मुद्द्यावर दोन वेळा चौकशीही केली होती. या तपासादरम्यान एका व्हिसलब्लोअर अभियंत्याचा मृत्यूही झाला. त्याने सांगितले होते की ‘ड्रीमलाइनर’ ज्या निकषांवर विकले जात होते ते निकष फसवे होते. हलक्या वजनाची बॉडी, आकर्षक डिझाइन यामुळे विक्रीत वाढ झाली, मात्र त्या मागे गुणवत्ता नियंत्रणावर मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले.

भारतामध्ये घडलेला हा अपघात, अमेरिकेत का घडला नाही, असा सवालही उपस्थित होतो. ‘बोईंग’ कंपनीच्या विमानाचा अमेरिका उपयोग करत नाही, पण तीच विमाने भारताला विकली जातात, हे चिंताजनक आहे.

 

अमेरिकन Prospect या अहवालात अनेक गंभीर बाबी मांडल्या आहेत. या अहवालानुसार, ‘ड्रीमलाइनर’ खरेदीचा निर्णय हा एक राजकीय निर्णय होता. यूपीए सरकारच्या काळात, शरद पवार यांच्या पक्षातील नेते प्रफुल्ल पटेल एव्हिएशन मंत्री होते. तेव्हा मूळतः २८ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव होता, मात्र ६८ विमानांची खरेदी करण्यात आली,त्यात ४० ड्रीमलाइनर होती.

यावरून मोठा वाद निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी सुरू झाली, मात्र पुढे प्रफुल्ल पटेल यांनी भाजपशी जवळीक साधत चौकशी बंद होण्याचा मार्ग तयार केला. आज जे लोक त्यांच्यावर आरोप करत होते, तेच लोक आता त्यांची स्तुती करत आहेत. हे दुर्दैवी आहे.

 

मोदी सरकार आल्यावर, एव्हिएशनमधील एका मंत्र्याने ‘बोईंग’ कंपनीकडून विमाने घेणे चुकीचे असल्याची तीव्र टीका केली होती, विशेषतः जेव्हा एअर इंडिया कंपनी ४०,००० कोटींच्या तोट्यात होती. त्याच वेळी आपल्या देशातील ५७ आंतरराष्ट्रीय मार्ग तोट्यात चालत होते. तरीही, एका महिन्याने त्याच सरकारने ओरड करणाऱ्या मंत्र्याने ५ नवीन ‘ड्रीमलाइनर’ विमाने खरेदी केली.

 

अमेरिकन ‘Prospect’ च्या अहवालानुसार, २००९ ते २०१६ दरम्यान ‘किचन्स’ नावाच्या महिला अधिकार्‍यांनी गुणवत्ता तपासणी दरम्यान गंभीर दोष निदर्शनास आणले होते. हे विमान, जे भारतात अपघातग्रस्त झाले, ते २०१४ मध्ये ‘वॉशिंग्टन फॅसिलिटी’तून एअर इंडियाला देण्यात आले होते. या विमानाच्या शेपट्याची (तेल) निर्मिती ‘चार्ल्सटन’ फॅसिलिटीमध्ये झाली होती, जिथे गुणवत्ता नियंत्रणावर वारंवार आरोप झाले होते.जे सहा विमाने ‘बोईंग’ कंपनीने स्वतः वापरण्याच्या लायकीची मानली नाहीत, ती विमाने भारतात विकली गेली, ही अत्यंत गंभीर बाब आहे.भारत हा प्रगतिशील राष्ट्र आहे. पण जेव्हा आपल्या देशात अशा जुनाट आणि दोषपूर्ण वस्तू विकल्या जातात, तेव्हा ही स्थिती आपल्यासाठी अपमानास्पद ठरते. ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्सच्या बाबतीतही अशीच स्थिस्ती आहे त्यांच्या अपघाताची दुर्दैवी मालिका सुरू आहे.

 

भारतीय सरकारने अमेरिकन अहवालांवर आधारित प्रश्न ‘बोईंग’ कंपनीला विचारले पाहिजेत. अमेरिकन सरकारने ज्या तक्रारींवर चौकशी सुरू केली, त्याच बाबी आपण दुर्लक्षित का करतो? या अपघातात जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना शिक्षा मिळेल का, हा गंभीर प्रश्न आहे. ‘अमेरिकेचे रिजेक्टेड प्लेन’ जर भारतात विकले जात असतील, तर हे आपल्या नेतृत्वाचे अपयश नाही का?

 

आपण एवढे भिकारचोट आहोत का, की आपल्याला निकृष्ट वस्तू विकल्या जात आहेत? यात केवळ भारतीय नागरिकच नव्हे, तर कॅनडा, इंग्लंड आदी देशांचे नागरिकही बळी गेले आहेत. मानवतेचा विचार करणाऱ्या भारताने ही दुर्दशा पत्करावी, हे अत्यंत दुर्दैवी आहे.पत्रकार अशोक वानखेडे प्रश्न विचारतात – जर आपण सांगत असू की अमेरिकेने आपल्याला कबाड विकले, तर ते विचारणे चुकीचे कसे ठरेल? कोणीतरी यामध्ये ठाम, जबाबदार आणि निर्भय निर्णय घ्यायला हवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!