नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील व्यंकटेश पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तिन जणांनी मिळून हिशोबात घोळ करत 3 लाख 20 हजार 500 रुपये आपल्या खिशात टाकले आहेत.
यशवंत वसंतराव कुलकर्णी हे व्यंकटेश पेट्रोलपंपचे व्यवस्थापक आहेत. मागील दोन वर्षापासून त्यांच्याकडे मस्नाजी चंदर टाळीपोटी, ज्ञानेश्र्वर प्रकाश चव्हाण आणि ज्ञानेश्र्वर नामदेव पवार तिघे रा.परतपुर ता.मुखेड जि.नांदेड यांनी पेट्रोल व डिझेल विक्रीचा हिशोब करतांना त्यात घोळ करून 3 लाख 20 हजार 500 रुपये लंपास केले आहेत. मुक्रामाबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 81/2025 दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक तिडके हे करीत आहेत.
मुखेड तालुक्यातील व्यंकटेश पेट्रोप पंपावर 3 लाख 20 हजार 500 रुपयांचा घोळ
