नांदेड(प्रतिनिधी)-16 हजारांची लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांना 30 हजारांच्या जात मुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन दिली आहे. पण यासोबत बऱ्याच अटी लावल्या आहेत. त्यामध्ये या दोन महिला तलाठ्यांना दर शनिवारी 11 ते 2 यावेळेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावायची आहे.
29 मे रोजी आलेल्या तक्रारीनुसार दोन महिला तलाठ्यांनी एका तक्रारदाराकडून त्याच्या पत्नीच्या नावावर 7/12 करण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्विकारली. हा लाच स्विकारण्याचा प्रकार 4 जून रोजी झाला. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले होते आणि नंतर न्यायालयीन कोठडी अर्थात तुरूंगात रवाना केले होते. या संदर्भाने जामीन अर्जावर काल दि. 9 जून रोजी आदेश देण्यात आला.
नांदेडचे दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी लाच स्विकारणाऱ्या भाग्यश्री भिमराव तेलंगे (34) आणि सुजात शंकर गवळे (25) यांना 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. सोबतच अटी लावल्या आहेत. त्या अटींप्रमाणे या दोन्ही तलाठी महिलांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील तपासिक अंमलदार (आयओ) बोलावतील तेंव्हा हजर राहायचे आहे. त्यांनी फरार होवू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणून नये. न्यायालयाने दिलेल्या अटींप्रमाणे दोन्ही महिला तलाठ्यांनी आपला खरा पत्ता आयडी आधारासह द्यायचा आहे. सोबतच दोन जवळच्या नातलगांचे पत्तेसह आयडी आधारासह द्यायचे आहेत. दर शनिवारी 11 ते 2 या वेळेत या दोन महिला तलाठ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी द्यायची आहे. न्यायालयाने दिलेल्या अटींमध्ये चुक झाली तर जामीन रद्द होईल असेही आदेशात लिहिले आहे. या प्रकरणात महिला तलाठ्यांच्यावतीने ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी भरपूर मेहनत घेतली.
लाच स्विकारणाऱ्या दोन महिला तलाठ्यांना दर शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी
