नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 30 मे रोजी बदल्या केलेल्या सर्वच पोलीस अंमलदारांना रात्री 8 वाजेपर्यंत नवीन बदल्यांच्या ठिकाणी सोडण्याचे आदेश एका बिनतारी संदेशाद्वारे प्रसारीत केले आहे. आदेश अत्यंत उत्तम आहेत. पण 30 मेच्या बदल्या होण्यापुर्वीपासून जे पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी दुसऱ्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचे काय होणार? या बाबत या आदेशात काहीच उल्लेख नाही.
आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस उपअधिक्षक, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय आणि अपर पोलीस अधिक्षक भोकर यांच्यासाठी प्रसारीत केलेल्या आदेश क्रमांक 987 /2025, आस्था-प्र.लि./ बदली-कार्यमुक्त/2025 दि.10 जून 2025 नुसार आदेशित केले आहे की, 30 मे 2025 नुसार ज्या पोलीस अंमलदारांची बदली झाली आहे. त्या सर्वांना आजच म्हणजे दि.10 जून 2025 रोजी रात्री 8 वाजता कार्यमुक्त करावे. अन्यथा प्रभारी अधिकारी यांच्याविरुध्द नियमाप्रमाणे शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या विभागातील बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त करून तो संबंधीत आढावा पोलीस अधिक्षक कार्यालयास ई-मेल आयडीवर किंवा हस्तपोच देखील न चुकता सादर करावा. या बिनतारी संदेशाला हस्ते स्थानिक गुन्हा शाखा, शहर वाहतुक शाखा, नियंत्रण कक्ष, महिला सहाय्यता कक्ष, जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, अंगुली मुद्रा शाखा, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्युआरटी शाखा, आरसीपी शाखा, सायबर शाखा, एटीबी आणि राखीव पोलीस निरिक्षक पोलीस मुख्यालय नांदेड यांना देण्यात आले आहे.
इतरांचे काय
पोलीस अधिक्षकांनी अत्यंत सुंदर आदेश प्रसारीत केले आहेत. कारण यापुर्वीच्या बदल्यांमध्ये बदल्या झालेले पोलीस अंमलदार आजही त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी त्यांची बदली झाल्यानंतर सुध्दा ते पोलीस अंमलदार गेले नाहीत. तसेच स्थानिक गुन्हा शाखेत सुध्दा असे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. ज्यांची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखेत नाही असाच प्रकार अनेक पोलीस ठाण्यांमध्ये सुध्दा आहे. ज्या पोलीस अंमलदारांची बदली 2024 च्या सार्वजनिक बदल्यांमध्ये झालेली आहे. पण ते अद्याप नवीन जागे गेले नाहीत. त्या पोलीस अंमलदारांबाबत आणि पोलीस अधिकाऱ्यांबाबत या आदेशात काहीच सांगण्यात आलेले नाही. काही अधिकारी तर बाहेर जिल्ह्यातील आस्थापनेवर असतांना सुध्दा ते नांदेडमध्येच दिसतात. त्यांचे काय होणार? याबद्दलही विचार होण्याची गरज आहे.
पोलीस अधिक्षकांनी बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांच्या कार्यमुक्तीचा आदेश निर्गमित केला
