नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीचा तपास करीत असतांना एका चोरट्याकडून 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. त्या दुचाकी कोठून चोरल्या याचा शोध सुरू आहे.
दि.7 जूनच्या रात्री मिर्झा मुस्सबीर मिर्झा अफसर बेग यांची दुचाकी गाडी चोरीला गेली. त्या संदर्भाने गुन्हा क्रमांक 554/2025 दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, विठ्ठल भिसे, संघरत्न गायकवाड, शंकर माळी यांनी आमेर खान गोलू खान (24) रा. चौफाळा पाणीच्या टाकीजवळ नांदेड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एम.एच.26 सी.डी.6157, एम.एच.32 ए.एन.5283 आणि तिन दुचाकी गाड्या नोंदणी क्रमांक नसलेल्या अशा पाच गाड्या जप्त केल्या. या सर्व गाड्यांची किंमत 2 लाख 35 हजार रुपये सांगण्यात आली आहे. या गाड्या कोठून चोरी केल्या आहेत. याचा शोध सुरू आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या
