नांदेड(प्रतिनिधी)-टेक्सकॉम टेक्सटाईल मराठवाडा लि.या कंपनीत तयार केलेले पोळी साठविण्याचे डबे आणि बॉटलचे 17 बॉक्स, भंगार सामान, वायर बंडल अशा एकूण 2 लाख 66 हजार रुपयांची चोरी झाली आहे.
टेक्सकॉमचे मॅनेजर सुनिल रामराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जूनच्या रात्री 8 ते 6 जूनच्या सकाळी 8 वाजेदरम्यान टेक्सकॉम टेक्सटाईल मराठवाडा लि.कंपनी सिडकोच्या गोडाऊनच्या भिंतीला छिद्र पाडून खिडक्यांचे ग्रिल कटरने कापून तयार ठेवलेले पोळी साठविण्याचे डबे 800 नग, पाण्याच्या बॉटल 17 बॉक्स, काही भंगार सामान आणि वायर बंडल असा एकूण 2 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 555/2025 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.
टेक्सकॉम टेक्सटाईलमध्ये 2 लाख 66 हजार रुपयांची चोरी
