नांदेड(प्रतिनिधी)-टेंभुर्णी ता.हिमायतनगर येथे एका 75 वर्षीय आजीचा खून करून नातवाने घरातून 2 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
किशनराव दत्तराव वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जूनच्या सायंकाळी 5 ते 5 जूनच्या दरम्यान गयाबाई रामजी तवर उर्फ देवसरकर (75) वर्ष रा.टेंभुर्णी ता.हिमायतनगर यांचा नातू मारोती उर्फ बाळू पांडूरंग वानखेडे (35) रा.दिघी ता.हिमायतनगर याने आजीचा खून करून त्यांच्या घरातील 23 ग्रॅम सोन्याचे दागिणे 1 लाख 84 हजार रुपये किंमतीचे आणि 90 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 122/2025 नुसार दाखल केली असून हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत अधिक तपास करीत आहेत.
नातवाने आजीचा खून करून 2 लाख 74 हजारांचा ऐवज चोरला
