नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एका शेतात कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 9 गोवंश जनावरे पकडले आहेत त्यांची एकूण किंमत 3 लाख 65 हजार रुपये आहेत.
अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मिळालेल्या माहितीनुसार अर्धापूर शिवारातील देऊबाई सरोदे यांच्या शेतात 9 गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली आहेत. या संदर्भाने पोलीस पथकाने तेथे जावून त्या 9 गोवंश जनावरांचा पंचनामा तयार केला आणि ती जनावरे गणपूर कामठा येथील गोशाळेच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. या प्रकरणी देऊबाई सरोदे व एक अनोळखी माणुस अशा दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 336/2025 दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरिक्षक भोसले, पोलीस अंमलदार प्रकाश बोदेमवाड आणि सुभाष मुंगल यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
अर्धापूर पोलीसांनी 9 गोवंश जनावरे पकडली
