तीन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि सहा पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या ; दोघांना मुदतवाढ
नांदेड(प्रतिनिधी)-आस्थापना मंडळाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार दोन महिन्यापुर्वी नियुक्ती दिलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचे ठाणे बदलण्यात आले आहे. एकूण 5 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत आणि 8 पोलीस उपनिरिक्षकांना बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये दोन जणांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांचे आहेत.
दोन महिन्यापुर्वीच इतवारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश ज्ञानदेव मुळीक यांना पोलीस ठाणे उस्माननगर येथे नियुक्ती देण्यात आली होती. कारण त्या ठिकाणचे दबंग सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना बदली झाल्यानंतर दीड वर्षांनी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे. आता दोन महिन्यातच महेश ज्ञानदेव मुळीक यांना पोलीस ठाणे माळाकोळी येथे पाठविण्यात आले आहे आणि माळाकोळी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय धोंडीराम निलपत्रेवार यांना पोलीस ठाणे उस्माननगर येथे आणले आहे. या अदलाबदलीत काय राजकारण असेल अशी चर्चा सुरू झाली आहे. सोबतच वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय गंगाधर मंठाळे यांना पोलीस ठाणे बारड येथे पाठविण्यात आले.कारण बारड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष वामनराव केदासे यांची बदली पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यात केली आहे.
दुसऱ्या एका आदेशात नियंत्रण कक्षात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीराम बालाजी माचेवाड यांना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे नियुक्ती देवून सलग्न माननिय विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या कार्यालयात पाठविले आहे. वरिष्ठ कार्यालयांनी सलग्न ही प्रथा बंद केलेली आहे. सोबतच शिवाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुभाष गोकुळ माने यांना हिमायतनगर पोलीस ठाण्यात पाविण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आशिष सिताराम बोराटे-विमानतळ, विमानतळ सुरक्षा पथकातील बालाजी महादु गाजेवार-पोलीस ठाणे नंादेड ग्रामीण, नियंत्रण कक्षातील बाबु मसाजी शिंदे-विमानतळ सुरक्षा पथक, हरजिंदरसिंघ चावला एटीबीमधून पोलीस ठाणे वजिराबाद, पोलीस ठाणे इतवारा येथील रमेश साहेबराव गायकवाड पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे. बीडीडीएसमधील संदीप प्रल्हाद जोंधळे यांना लोहा येथे पाठविण्यात आले आहे. शहर वाहतुक शाखा वजिराबाद येथील पोलीस उपनिरिक्षक जसपालसिंघ राजासिंघ कोटतिर्थवाले यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तसेच पोलीस अधिक्षकांचे वाचक अशोक शिवदास देशमुख यांना सेवानिवृत्तीपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे.
अर्धापूर आणि माळाकोळीमध्ये अदलाबदली; दत्तात्रय मंठाळे यांना बक्षीस
