नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील पालम रस्त्यावर असलेले इंडिया वन पेमेंट कंपनीचे एटीएम चोरून चोरट्यांनी चुना लावला आहे. त्यामध्ये रक्कम 2 लाख 86 हजार 800 रुपये होती. तसेच चोरून नेलेली एटीएम मशीन 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची .
मुस्तफा एकबाल हुसेन सैफी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोहा गावातील पालम रस्त्यावर जय महाराष्ट्र बार समोर इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनीचे मशिन होते. कोणी तरी चोरट्यांनी 28 मे रोजी मध्यरात्रीनंतर 2.45 वाजेच्यासुमारास तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारुन एटीएम मशीनच चोरून नेले आहे. त्या मशिनमध्ये 2 लाख 86 हजार 800 रुपये होते. तसेच त्या एटीएम मशीनची किंमत 2 लाख 50 हजार रुपये आहे. असा एकूण 5 लाख 36 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 155/2025 नुसार दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक निवळे अधिक तपास करीत आहेत.
लोहा येथे 2 लाख 86 हजार रुपये रक्कमेसह एटीएम मशीन चोरून नेले
