नांदेड(प्रतिनिधी)-20 मे रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास ग्यानमाता शाळेजवळ एका 19 वर्षीय युवकाला तिन जणांनी शरिरावर अनेक जागी वार करून त्याचा खून केला आहे.
गणेश ईश्र्वर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास त्याचा भाऊ प्रविण पवार आणि त्याचा मित्र विनु यांचे साई रेड्डी यासोबत वाद झाला होता.तो वाद सोडविण्यासाठी मी पण गेलो होतो. तेथे ते भांडण सोडवून मी माझ्या भावाला घरी परत घेवून आलो. 20 मे रोजी माझा वाढदिवस असल्याने प्रविणने माझ्यासाठी केक आणला. त्यानंतर सर्व कुटूंबियांनी केेकचा आनंद घेवून जेवण केले. त्यानंतर रात्री 8 वाजता माझा भाऊ प्रविणने मला सांगितले मित्राचा फोन आला आहे मी बाहेर जाऊन येतो आणि तो गेला. थोड्या वेळानंतर प्रविणचा मित्र निखील घरी आला आणि म्हणाला की, भाऊ लवकर चला प्रविणला साई रेड्डी, पार्थ जाधव आणि ओम्या उर्फ अजय सुर्यवंशी यांनी ग्यानमाता शाळेजवळ प्रविणला खंजीरने मारले आहे. मी जाऊन पाहिले असता रस्त्याच्या दुभाजकावर माझ्या भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. त्यांनी सांगितलेल्या हकीकतीप्रमाणे तिघांनी त्याला जमीनीवर पाडून ओम्या व पार्थने प्रविणचे हातपाय पकडले आणि साई रेड्डीने खंजीरने त्याच्या शरिरावर अनेक जागी मारहाण केली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 115(2), 115ं(2), 352 आणि 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 200/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साने यांच्याकडे देण्यात आला आहे.
तिघांनी केला 19 वर्षीय युवकाचा खून
