नांदेड:- आज दि.19 मे 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली याचा मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी जिल्हा स्तरावर मान्सूनपूर्व पूर्व तयारी साठी बैठक जिल्हा मधील सर्व विस्तार अधिकारी आरोग्य, आरोग्य सहायक, जिल्हा हिवताप अधिकारी विभागातील अधिकारी व कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बोलत असताना जिल्हा मध्ये पावसाळ्यात जलजन्य आजार व किटकजन्य आजाराची साथ उदभवणाऱ नाही याची दक्षता घ्यावी असे डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी बैठक मध्ये नदीकाठच्या पूरग्रस्त गावात करायचे साथरोग दृष्टीने करावयाचे उपाययोजना तसेच पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत मान्सूनपूर्व गावातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची स्तोत्रचे व शाळा व आश्रम शाळा व वसतीगृह येथील पाणी नमुने तपासणी अभियान राबविणे, पुर परिस्थिती करावयाचे उपाययोजना, बिल्चीग पावडर वापर व त्यांचे व्यवस्थापन, अति जोखिम गरोदर माता, लहान बालके व वयोवृद्ध यांना सुरक्षित ठिकाणी पाठविणे व राष्ट्रीय किटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मलेरिया व डेंग्यु यांचा आढावा व मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य विषयक तसेच सर्व दर्शक निहाय आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सुर्यवंशी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अमृत चव्हाण , साथरोग अधिकारी डॉ अन्सारी शेख, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेन्द देसाई आदि उपस्थित होते. या वेळी सभागृहात अतिरिक्त कार्यभार जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अमृत चव्हाण सर यांचा सत्कार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख तसेच जिल्हा आरोग्य विस्तार अधिकारी संघटना यांच्या वतीने करण्यात आला. सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व आरोग्य विस्तार अधिकारी, हिवतापचे सर्व आरोग्य पर्यवेक्षक,सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक सर्व बहुसंख्येने उपस्थित होते.
