नांदेड(प्रतिनिधी)-वैद्यकीय महाविद्यालयातील एका 22 वर्षीय विद्यार्थ्याने हस्सापूर पुलावरून उड्डी मारून आत्महत्या केली आहे. आज त्याचा मृतदेह सापडला आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबियांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरुध्द तक्रार केली आहे.
पुनित विनोद वाटकर (22) रा.अमरावती आणि सध्या राहणार वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी याचा मृत्यदेह गोदावरी नदीपात्रात आज सापडला. त्याने दोन दिवसांपुर्वी गोदावरी नदीपात्रात उड्डी मारल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुनित वाटकरच्या मृत्यसंदर्भाची सर्व कायदेशीरप्रक्रिया वजिराबाद पोलीस ठाणे पुर्ण करीत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुनितच्या कुटूंबियांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर आक्षेप घेत त्यांच्या त्रासामुळेच आमच्या पोराने आत्महत्या केली असा आरोप आहे. त्याला काही तरी असाईंटमेंट देण्यात आले होते आणि ते पुर्ण न झाल्यामुळे कोणती महिला प्राध्यापक त्रास देत होती असा पुनित वाटकरच्या कुटूंबियांचा आरोप आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांची आत्महत्या ; कॉलेज प्रशासानावर आरोप
