नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडमध्ये एका खाजगी रूग्णालयात उपचार घेतलेल्या जखमीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्यांंच्या भावाला काल हिंगोली शहरात दुपारी हिंगोली जिल्हा पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी आपल्या साथीदारांसह जबर मारहाण केली आहे. जखमीचे भाऊ सांगतात अद्याप आमची तक्रार हिंगोली शहर पोलिसांनी घेतलेली नाही. पण नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी नांदेडमध्ये सुरू असलेल्या उपचारांसदर्भाने एमएलसी दखल घेतली आहे.
हिंगोलीचे रहिवाशी सय्यद मोईन हे आपल्या भावाला नांदेड येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना फोन करून माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, काल दि. 13 मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माझे लहान भाऊ सय्यद मोबीनउल्ला सय्यद अहेमद (45) यांना अनेक घातक हत्यारांनी मारहाण केली. त्यावेळी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो. माझ्या भावाला मारहाण झाली म्हणून मी थेट नांदेडला आलो आणि माझा जखमी भाऊ सय्यद मोबीनउल्ला सय्यद अहेमद यांच्यावर उपचार सुरू आहे. सय्यद मोबीनउल्लाचे मोठे भाऊ सय्यद मोईनउल्ला यांनी सांगितले की, माझ्या भावाचे डोके फुटले आहे. तो कालपासून बेशुद्ध आहे. त्याच्या हातात आणि पायात स्टिल रॉड टाकावे लागत आहे, अशी जबर मारहाण माझ्या भावाला झाली आहे. या मारहाणीसाठी हिंगोली पोलीस दलातील बीडीडीएस विभागातील पोलीस अंमलदार शेख एजाज आणि त्यांचे काही साथीदार जबाबदार आहेत. माझ्या भावाला मारहाण करून हल्लेखोर माझ्या मस्तानशहा भागातील घरावर सुद्धा आले होते, त्यावेळी माझी पत्नी तेथे होती, त्यांनी 112 क्रमांमाला फोन केला होता, पण पोलीस आले नाही. आज आतापर्यंत माझी पत्नी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बसून आहे, अद्याप तिची तक्रार घेण्यात आली नाही. सय्यद मोईनउल्ला यांनी सांगितले की, पोलीस असलेल्या शेख एजाजचे भाऊ शासकीय जमिनीवर दोन मोबाईलचे दुकान चालवतात. आज 14 मे रोजी सुद्धा त्या पोलिसाने मला फोन करून धमकी दिली आहे की, तुम्ही केकस कशी करता हे पाहून घेतो.
