नविन मुख्य न्यायमूर्तीची शपथ घेण्यापूर्वीच न्या. भूषण गवई यांनी अनेकांना आणला हिवताप

नांदेड,(प्रतिनिधी)-भारताचे सरन्यायाधीश होण्यापूर्वीच न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मी सेवानिवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही आणि संविधानापेक्षा या भारतात दुसरे कोणी उच्च नाही असे सांगितले आहे. त्यामुळे अनेकांच्या मनसुब्यावकर पाणी पसरले आहे. यामुळे भारतातील अनेकांच्या मनात हिवताप घुसला असेल.

आज भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची सेवानिवृत्ती झाली. उद्या याच पदावर नवीन सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई पदभार सांभाळणार आहेत.या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या घरी पत्रकारांना बोलावले होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले की सेवानिवृत्तीनंतर मी कोणताही कार्यभार घेणार नाही किंवा सांभाळणार नाही. तसेच माझी कोणतीही राजकीय महत्त्वकांक्षा नाही. ही त्यांची शब्दावली सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी बसवणारी आहे. मी संविधानाप्रमाणेच काम करणार आहे असे ते म्हणाले. असाच असतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पुत्र.निर्णय देताना मी सेवानिवृत्तीनंतरचा विचार करणार नाही.मला कोणत्याही पद घ्यायचे नाही आणि माझी कोणतीही महत्त्वकांक्षा नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 2013 -14 मध्ये पी. सदाशिवम हे सरन्यायाधीश सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना केरळचे राज्यपाल बनवण्यात आले होते. रंजन गोगोई 2020 मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर ते राज्यसभेचे सदस्य झाले होते. याला जोडून पत्रकारांनी भूषण गवळी यांना विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भूषण गवळी म्हणाले इतरांबद्दल मला बोलता येणार नाही. परंतु मी सेवानिवृत्तीनंतर काहीच घेणार नाही. याच्यासोबत त्यांनी कही न सांगता बरेच काही सांगितले, ते म्हणाले शिष्टाचारा प्रमाणे सरन्यायाधीश हे पद राज्यपालांच्या पदाच्या बरेच वरचे पद आहे. यावर वाचकांनी समजून घ्यायचे आहे की न्यायमूर्ती भूषण गवई काय म्हणाले. असाच भाव राज्यसभेच्या सदस्या बद्दल भूषण गवई यांचा आहे.म्हणजे खा. निशिकांत दुबे यांना त्यांनी सूचना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात असे अनेक निर्णय होतात ज्या मधून सरकार सुटते आणि त्यानंतर त्या सरन्यायाधीशांना सरकार रि सेटल करते आणि म्हणूनच न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी होत गेला आहे. न्यायमूर्ती भूषण भूषण गवई यांना ज्यांनी आपली राजकीय इच्छाशक्ती पण नसल्याचे सांगितले कारण त्यांचे पिताश्री दादासाहेब उर्फ रा.सु.गवई अत्त्यंत यशस्वी नेते होते. राजकारणात मतभेद असतात पण मनभेद नसतात, असे रा.सू. गवई यांचे व्यक्तिमत्व होते. राजकीय गोष्टी आणि जुन्या आठवणींचा खजाना होता त्यांच्याकडे, अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा ते खूप जवळचे होते. त्यांचे एक सुपुत्र डॉक्टर आहेत आणि एक आता उद्या भारताचे मुख्य न्यायमूर्ती होणार आहेत. शपथ घेण्यापूर्वीच न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दाखवलेला ट्रेलर अनेकांच्या मनात धडक्या भरणार आहे. मला काही नाही पाहिजे असे त्यांनी सांगितले म्हणजे सर्वच विकाऊ नसतात असा त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे. यामुळे सरन्यायाधीशांसोबत खेळ करणारी सरकार आता हिट झाली आहे, आणि स्वतः सेवानिवृत्तीनंतर चे स्वप्न घेऊन सीजीआय होणाऱ्यांमध्ये गवई नाहीत हे सिद्ध झाले. सुप्रीम पार्लमेंट या शब्दाबद्दल बोलताना भूषण गवई म्हणाले खूप पूर्वी केशवानंद भारती या प्रकरणांमध्ये तेरा न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निर्णय दिला होता.त्यात भारतातील संविधान सर्वोच्च आहे कोणीही संविधानापेक्षा मोठे नाही. न्यायपालिका संविधानाची अभिरक्षक आहे.सर न्यायाधीशांनी सर्वांशी मिळून विसरून वागायला हवे, त्यामुळे आज समाजात काय चालले आहेत याची माहिती त्यांना मिळते आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रकरणांमध्ये निर्णय देताना योग्य न्याय दिला जातो असे न्यायमूर्ती भूषण गवईनां वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!