भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीची युद्ध विरामाची घोषणा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. काय घ्यावे या घटनेतून कारण शिमला करारानुसार भारतात आणि पाकिस्तानमध्ये काही तणाव झाला तर कोणताही पक्ष मध्यस्थी नसेल तर यात तिसरा पक्ष आला कसा. याच भारताच्या भुमिवर 1971 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी असताना त्यांनी त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निकसन यांना कोणतीच भीक घातली नव्हती. त्यावेळी निकसनने अमेरिकेचा सर्वात अद्यावत असलेला सातवा समुद्री आरमार बेडा भारताच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात उभा करून दबाव आणला होता.

त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, सातवे नाही तर आठवे आरमार सुद्धा आणून उभे केले तरी भारत भिणार नाही. अमेरिकमेच्या सातव्या आरमारात परमाणु हत्यारे सुद्धा होती.
22 एप्रिल रोजी पहलगाव येथे निरागस 26 पर्यटकांना मारणाऱ्या अतिरेक्यांचा शोध अजून लागलाच नाही. त्यांना कंठस्नान घालण्यात आले नाही, पण 14 दिवसांनंतर भारताने दि. 7 मे च्या रात्री 1.5 वाजता विमानांन्या माध्यमाने पाकिस्तानमध्ये अतिरेकी उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर नऊ ठिकाणी हल्ला केला. त्यात बरेच अतिरेकी मारले गेले आणि तो हल्ला आमच्या नागरिकांवर आहे, असा खोटा कांगावा करून पाकिस्तानने युद्ध सुरू केले. हे युद्ध 10 मे च्या दुपारी 5.33 वाजता संपल्यांची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर लगेच 4 मिनीटांनी 5.37 वाजता अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी ही घोषणा केली. पुढे 5.38 वाजता पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी ही घोषणा केली. त्यानंतर भारतीय विदेश सचिव आणि विक्रम मिसीर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंह यांनी 5.55 वाजता पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या अगोदर एएनआयने 10 मेच्या दुपारी 3.55 वाजता प्रसारित केलेल्या माहितीनुसार भविष्यात आंतकवादी कारवाईला सुद्धा युद्ध समजले जाईल, यावरूनच युद्ध विरामावर चर्चा सुरू आहे, याची कल्पना येते. पण प्रश्न हा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युद्ध थांबल्याची घोषणा कशी करतात. कारण भारत-पाकिस्तानमध्ये तिसऱ्या पक्षाला मध्यस्थी करण्यासाठी शिमला करारानुसार जागाच नाही. हाच तर मोठा खेळ झाला आहे. या अगोदर 9 मेच्या रात्री 11.55 वाजता भाजपच्या राष्ट्रीय हॅण्डलवर सन 2011 चा पठाणकोठ हल्ला, सन 2013 चा हैदराबाद हल्ला आणि 2010 चा पुणे हल्ला याचे चित्र प्रसारित करून आता युपीए सारखी अवस्था नाही. नवीन भारतामध्ये शांती वार्ता करण्याइतपत धैर्य शिल्लक नाही. म्हणजे आम्ही पाकिस्तानला पूर्णपणे धडा शिकवू असा त्याचा अर्थ होता. पण 2010, 2013, 2011 चे हल्ल्यांचे फोटो दाखवणाऱ्या त्यानंतर झालेल्या अतिरेकी कारवायांची फोटो दाखविले नाही. त्यावेळी त्यांनी काय केले. त्यात संसद हल्ला झाला. त्याच्यासह अनेक हल्ले झाले. पण त्या हल्ल्यांचे फोटो दाखवले नाहीत.

मान्य करूया की युद्धविराम झाला. पण पाकिस्तान काय गप्प बसले काय. पहलगाम हल्ल्यांच्या अतिरेक्यांंना अजून कंठस्नान घालायचे आहे. त्यानंतर पाकिस्तानाने भारतीय नागरिकांवर हल्ला करून 15 जणांचा जीव घेतला आहे. तरी पण युद्धविराम का झाले. माजी थलसेना प्रमुख मनोज नरवणे लिहितात, पिक्चर अभी बाकी है, त्यांच्यासोबत अनेक सेवानिवृत्ती सैन्यप्रमुख या युद्ध विरामावर नाराज आहेत. 1971 नंतर आज तयार झालेली स्थिती आज भारतासाठी पोषक होती. पण 9 मे रोजी आयएमएफने पाकिस्तानला कर्ज दिले ते का. त्यावर भारताने आक्षेप घेतला होता. पुरावे दिले होते, तरी पण त्यांना कर्ज दिले. याच्यातच काही तरी गोम लपलेली आहे. परंतु भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला युद्धविरामाची घोषणा देण्याचा अधिकार देऊन काय साध्य केले. शिमला कराराप्रमाणे इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी बाजपेयी, डॉ. मनमोहनसिंघ यांनी सुद्धा अनेकवेळेस तिसऱ्या पक्षाला भारत-पाकिस्तानाच्या तणावात बोलण्याची परवागनी दिली नव्हती. म्हणून आज इंदिरा गांधींची आठवण होत आहे. अमेरिकेने परमाणू हत्त्यारांसह आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात उभे केले होते, तरी त्या भिल्या नाहीत. त्यांनी सैन्याला दिलेल्या मोकळकीने सैन्याने 17 दिवसांतच पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखविले होते. त्यावेळी सैन्याला मोकळीक दिले आहे, याचा सुद्धा प्रचार झाला नव्हता. आजच्या परिस्थितीत पाकिस्तान पुन्हा हल्ले करत आहे. भारतीय सैन्य त्यांना रोखठोक उत्तर देत आहे. परंतु युद्धविराम जाहीर झाल्याने आलेली संधी गमावलीच आहे, असे दिसते.

