अर्धापूर–तथागत भगवान बुद्ध यांच्या 2569 वि जयंतीनिमित्त उद्या दिनांक 12 मे 2025 सोमवारी अर्धापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा बौद्ध विहार येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी उमेश सोनाजी सरोदे यांनी एका प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात दिली आहे. प्रथम सत्रात सकाळी नऊ वाजता विहारामध्ये पंचशील ध्वजारोहण व पूजापाठ होणार असून सायंकाळी साडे चार वाजता महात्मा बसवेश्वर चौक येथून बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार असून शहरातील मुख्य रस्त्याने प्रज्ञा बुद्ध विहार येथे आगमन होईल. त्यानंतर पूजनीय भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. स्मृतीशेष सखुबाई दत्ता कांबळे अर्धापूरकर यांच्या स्मरणार्थ नांदेड येथील उपासिका कल्पना सुभाष काटकांबळे यांनी बुद्धमूर्ती दान केली आहे. तरी अर्धापूर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी उमेश सोनाजी सरोदे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
