नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी 9 मे रोजी सायंकाळी हरसद पाटीजवळ एक हायवा गाडी पकडली. त्यामध्ये चोरटी वाळू भरलेली होती. एकूण 45 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोनखेड येथील पोलीस उपनिरिक्षक वैशाली निवृत्ती कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हरसद पाटीजवळ त्यांनी हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.1744 ची तपासणी केली. त्यामध्ये 20 हजार रुपये किंमतीची वाळू भरलेली होती. या वाळूची कागदपत्रे नव्हती. हायवा गाडी 45 लाखांची आणि 20 हजारांची वाळू असा 45 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 11/2025 मध्ये सोनखेड पोलीसांनी हायवा गाडीचा चालक अनिल मारोती बुद्रूक रा.पांगरा ता.लोहा आणि गाडी मालक काळेश्र्वर वसंत ताटे रा.पोखरी ता.लोहा यांना आरोपी केले आहे.
ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पोलीस अंमलदार शिंदे, कौठेकर, कवाळे आणि शंकरे यांनी पुर्ण केली.
सोनखेड पोलीसांनी चोरट्या वाळूची गाडी पकडली
