नांदेड(प्रतिनिधी)-देशात सध्याच्या परिस्थितीत असलेल्या घटनाक्रमानुसार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी यांनी राज्य भरातील आरोग्य संस्थांना तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सध्या देशात पाकिस्तानमुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्व आरोग्य संस्था पुर्ण क्षमतेने तयार राहतील. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आप-आपल्या कर्तव्यावर उपस्थितीत राहतील याची खबरदारी घ्यावी, रुग्णवाहिका आणि इतर आपातकालीन वाहने सर्व आवश्यक जीवनरक्षक प्रणालीसह सहज उपलब्ध असावीत. सर्व आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी. सर्व उपकरणे, स्ट्रेचर, अभिकर्मक, ऑक्सीजन आणि इतर जीवनरक्षक प्रणाली तसेच खाटांची उपलब्धता सुनिश्चित करावी, फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वीत असल्याची खात्री करून घ्यावी. उपलब्ध असलेल्या रक्तपेढ्या पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत ठेवण्यात याव्यात. सर्व आरोग्य किट, अतिरिक्त डिस्पोजेबल वस्तुंसह शस्त्रक्रियागृह कार्यान्वीत राहील याची दक्षता घ्यावी. उपलब्ध प्रयोगशाळा पुर्ण संपुर्ण क्षमतेने कार्यान्वीत ठेवण्यात याव्यात. आवश्यकतेप्रमाणे मॉकड्रिल घेण्यात यावे. ब्लॅकआऊट झाला तर आरोग्य संस्थेची आपातकालीन सेवा सुरू राहिल. ब्लॅकआऊट पाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे उचीत कार्यवाही करावी अशा सुचनांचा यात समावेश आहे.
राज्यभरातील आरोग्य संस्थांना तयार राहण्याच्या सुचना
