युध्दाच्या खोट्या बातम्या प्रसारीत करणारे अँकर देशद्रोही का नाहीत

युध्दाच्या वातावरणात टी.व्ही.ने देशात घातलेला धुडघुस पाकिस्तानच्या मानसिकतेला बळ देणारा आहे. अत्यंत खोट्या बातम्या प्रसारीत करून आपला टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न केलेल्या वृत्तवाहिन्यांना का देशद्रोही म्हणले जात नाही हा प्रश्न आला आहे. रक्षामंत्रालयाने कानपिचकारल्यानंतर एका छोट्याशा अँकरकडून माफी मागण्यात आली आहे. परंतू कविता बनविणाऱ्या महिलेला देशद्रोही म्हटले जाते मग यांच्यावर बॅन का आले नाही. आमच्या मते मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारने यांना काहीही बोलण्याची दिलेली मुभा केंद्र शासनाच्याच अंगलट आलेली आहे. दुर्देव असे आहे की, या टी.व्ही.ने दिलेल्या बातम्या संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजु यांनी रिपोस्ट केल्या आहेत. म्हणजे सरकारच्या मंत्र्यांना टी.व्ही.मुळे कळत आहे की, देशात काय चालले आहे. काय म्हणावे या शासनाला. विदेश मंत्रालयाने 26 मार्च रोजी काय दाखवावे, काय दाखवू नये, काय लिहावे, काय लिहुन नये याच्या संदर्भाने एक आचार संहिता प्रसारीत केली होती. तरी पण या खोटारड्या पत्रकारांनी पत्रकारीतेच्या आस्मितेला मातीत मिळवून युध्दाच्या बातम्या दिल्या आहेत.


काही वृत्तवाहिन्यांमधील अँकर अर्नब गोस्वामी, सुभाषचंद्रा, चित्रा त्रिपाटी, श्वेतासिंह, अंजना ओम कश्यप, देवगन, रुबीका लियाकत हे असे व्यक्तीमत्व आहेत की यांनी मागील दहा वर्षात आपल्या चॅनलवर फक्त मोदी गाथा गायली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे देशात जाती-जातीमध्ये भांडण लागेल असे कार्यक्रम केले. त्यांच्या कार्यक्रमांची नावे देश को झुकने नही देंगे. या कार्यक्रमामध्ये दोन धर्मांच्या विरुध्द वाद-विवाद ठेवला जात असे. या वाद विवादात केंद्र सरकारला वाटते त्या धर्माच्या प्रति सकारात्मकता आणि इतर धर्मांप्रति नकारात्मकता दाखवून नुसता विष पसरविण्याचा कार्यक्रम या अँकरनी मागील दहा वर्ष केला. एका माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या सर्वच मंत्रालयांमधील जवळपास 50 टक्के निधी जाहीराती स्वरुपात काही चॅनल्सवर खर्च करण्यात आला. मोठी रक्कम प्राप्त होत आहे आणि सुरक्षा सुध्दा आहे. म्हणून या अँकर्सचा भाव वाढलाच होता आणि एखाद्या व्यक्तीचा भाव वाढल्यानंतर तो माकड चाळे करतोच ही मानवी प्रवृत्ती आहे. अशीच ही मंडळी करत आलेली आहे. रक्षा मंत्रालयाने कान पिचकारल्यानंतर नेहा पार्थव या छोट्याशा अँकरकडून आमची चुक झाल्याबद्दलची माफी मागण्यात आली. पण ज्यांनी बातम्या प्रसारीत केल्या. त्यांनी का नाही मागितली माफी, बातम्या प्रसारीत करतांना स्टुडीओमध्ये ते उड्या मारुन-मारुन सांगत होते. ऑपरेशन सिंदुरमध्ये सुध्दा या अँकरने संधी साधली आणि आपला टीआरपी आणि पैसे वाढवून घेतले.
आज पाकिस्तानकी आखरी रात, भारत का फायनल अटॅक, पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद पर कब्जा, पाकिस्तान के पीएम शहबाज सरेंडर, नेव्ही का कराचीपर हल्ला, पाकिस्तानपर फायनल हमला सुरू, भारत पर परमाणू हमला करेगा पाक, पाच घंटे में पुरा पाकिस्तान खतम, बंकरमे छिपे शहबाज, पाक सेना का सरेंडर लाईव्ह अशा हेडलाईन लावून या अँकरने बातम्या दिल्या. भारतीय सैन्याला सुध्दा माहित नव्हते की असे काही घडले आहे. मग कोठून आणल्या या बातम्या, कशा दिल्या या बातम्या. यांच्यावर काही नियंत्रण नाही काय? भारताचे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी सुध्दा अशीच एक बातमी रिपोस्ट केली. बातम्या खोट्या ठरल्याानंतर मात्र रिजीजू हे अँकर भारतीय सैन्याला कमजोर करत आहेत असे वक्तव्य दिले. त्यांनी ती रिपोस्ट त्यांचा विश्र्वास टी.व्ही.वर जास्त आहे. काय सांगावे या कृतीला. वाचकांनो या बातम्या पाहुन अनेक भारतीय नागरीकांनी जल्लोष सुरू केला. परंतू काही तासात त्यांना कळले की या बातम्या खोट्या आहेत. या बातम्या खोट्या असल्याचा शोध मोहम्मद जुबेरने लावला. गोदी मिडीयाचे फाटके अँकर ज्या व्हिडीओद्वारे बातम्या प्रसारीत करत होते ते व्हिडीओ अफगाणिस्तान, गाजा, भारतातील काही जुने व्हिडीओ ते पण अनेक वर्षापुर्वीचे दाखवून बातम्या केल्या आहेत हे सिध्द केले. शाब्बास त्या मोहम्मद जुबेरला.


वाचकांसमोर आमचा असा मुद्दा आहे की, सध्या सुरू असलेली भारत पाकिस्तानमधील परिस्थिती ही या दोन देशांसाठी महत्वाची नाही तर जगासाठी महत्वाची आहे. भारताचे पंतप्रधान, भारताचे रक्षामंत्री, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, विदेशमंत्री इतर देशांसोबत आजच्या परिस्थितीवर बोलतच असतील. विचार करा ते बोलत असतांनाच विदेशातील एखाद्या व्यक्तीने भारताच्या व्यक्तीला सांगितले की, तुमच्या सैन्याने पाकिस्तान ताब्यात घेतला काय ? तर भारताची परिस्थिती काय होईल याचा विचार या अँकरने केला नाही. देशातील प्रश्न-उत्तरे सुरू राहतील. पण आजच्या परिस्थितीत सैन्याच्यावतीने अधिकारीकपणे दिलेल्या माहितीशिवाय बातम्या छापणे हा देशद्रोहच आहे. या अँकर्सने प्रसारीत केलेल्या बातम्या म्हणजे त्यांनी भारताविरुध्द पाकिस्तानकडून सुपारी घेतली की काय? असे वाटत आहे. खरे बोलणाऱ्या वायर या चॅनला सरकारने बंद केले आहे. सध्या ते न्यायीक मार्ग शोधत आहे. परंतू खोट्या बातम्या दाखवून देशाची अबु्र जगात घालणाऱ्या या अँकरविरुध्द शासनाने काही केले नाही याचे आश्चर्यच वाटते. आमच्या सुरक्षा यंत्रणा किती मजबूत आहेत, आमचे सैन्य काय-काय करत आहे, आमचे विमान कुठून उड्डाले हे सांगायची काय करत आहे. या बाबीतर गुप्त ठेवायच्या आहेत. मग या दीड शाहण्या ऍकर्सने आपली टीआरपी दुकान 24 तास चालावी आणि विष विक्री करण्याचा आपला धंदा कायम राहावा यासाठीच हे या सर्व खोट्या बातम्या दिल्या आहेत. यांना लष्कर ए गिध्द अशी उपाधी दिली तरी ती काही चुकीची नाही.


दररोजच विदेश सचिव विक्रम मिसीर, कर्नल सोफीया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह दररोज सैन्याने काय केले याची माहिती सार्वजनिक करत आहेत. यात एका प्रश्नाला उत्तर देतांना विक्रम मिसीर यांनी सांगितले होते की, काय छापा, काय छापू नका, काय दाखवा आणि काय दाखवू नका तरी पण डोक्यात वारे शिरलेल्या या अँकर्सने पत्रकारीतेतील तत्व डोक्यावर बांधून मिस शाहना असल्याचे दाखवले. कारण देशाचे नुकसान प्रश्नांनी होत नाही तर खोट्या प्रसारणामुळे होते. आम्ही सुध्दा वाचकांना ही ग्वाही देत आहोत की, आमच्या सैन्याच्या पराक्रमाला रत्तीभर धक्का लागेल असे कृत्य आम्ही करणार नाही आणि आम्ही केलेच तर वाचकांनी आम्हाला क्षमा सुध्दा करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!