नांदेड(प्रतिनिधी)-काल पोलीस विभागाच्या वरीष्ठ सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अर्थात बदल्यांचे वारे वाहायला लागले आहे. हे लोण हळूहळू मंत्रालयातून जिल्हा स्तरापर्यंत येते. यामध्ये घोडे बाजार मोठ्या संख्येत चालत असतो. कोणाचा नंबर लागेल, कोण लावेल, कसा लावला जाईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मे महिन्याच्या शेवटपर्यंत स्पष्ट होते.
दरवर्षीच्या मे महिन्यातील 31 मे या तारेखपर्यंत राज्याच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुर्ण कराव्यात असा कायदा आहे. त्यानुसार उच्च स्तरावरून अर्थात मंत्रालयातून होणाऱ्या बदल्यांची सुरूवात झाली आहे. त्यात पोलीस विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या मंत्रालयाने केल्या आहेत. इतर विभागांच्या बदल्या सुध्दा काही प्रमाणात झाल्या आहेत. पुढे हे लोण विभागीय स्तरावर येते आणि त्यानंतर जिल्हास्तरावर येते.
जिल्हा स्तरात या बदल्यांच्या खेळात मोठा घोडेबाजार चालतो. नांदेड जिल्ह्यात तर एक बदल्यांचे केंद्रच आहे. ज्यांच्याकडे गेल्यावर हवी ती बदली मिळू शकते असा समज सर्वात शेवटच्या कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झालेला आहे. पण आज ही बदली कशी, कोठे, कोणी केली याची माहिती मे महिन्याच्या शेवटच्या दिवसानंतर समोर येईल.
बदल्यांच्या घोडे बाजाराला सुरूवात
