नांदेड(प्रतिनिधी)-वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असणार्यासह पोलीस दलात सेवा करणार्या कर्मचारी अधिकार्यांचे बारावी व दहावी परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी दि. 16 मे पर्यंत मो. 9422173735 क्रमांकावरर नोंदणी करण्याचे आवाहन दै. समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.
मीमांसा फाऊंडेशन, दै. समीक्षा व मंथन क्रिएटीव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील पुरस्कारासह वेगवेगळे सामाजिक उपक्रमातून उपेक्षित व कर्तृत्वानाचा सन्मान करण्यात येतो. नुकताच इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल लागला आहे. लगेच काही दिवसांनी इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल लागणार आहे. तरी वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असणार्यासह पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्यांच्या 80 टक्के गुण प्राप्त केलेल्या पाल्यांनी दि. 16 मे 2025 पर्यंत मो. 9422173735 या क्रमांकाव गुणपत्रिका टाकून नोंदणी करावी, तसेच दै. समीक्षा शिवाजीनगर नांदेड येथे गुणपत्रिकेची छायांकित प्रत आणून द्यावी. दहावीत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी 18 मे पर्यंत नोंदणीसाठी मुदत राहणार आहे. तरी सर्वांनी नोंद कारावी,असे आवाहन संपादक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.
