नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू वाहतूक करणारे दोन वाहन पकडून नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्यात वाहतुक होणारी चोरट्या पध्दतीची वाळू आणि वाहतूक करणारे वाहन असा 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात दि.3 मे च्या दिवसा 11.30 आणि 12.25 वाजेदरम्यान नांदेड ग्रामीण पोलीस पथकातील पोलीस अंमलदारांनी दोन वाहनांची तपासणी केली. त्यांचे क्रमांक एम.एच.43 ए.डी.0697 आणि एम.एच.04 एफ.डी.4658 यांची तपासणी केली. या दोन्ही गाड्यांमध्ये अवैधरित्या आणलेली चोरीची वाळू भरलेली होती. या संदर्भाने गाडीतील चालक काही समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. तेंव्हा पोलीस अंमलदार विष्णु कल्याणकर आणि रामदास आवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 423, 424/2025 असे दोन स्वतंत्र गुन्हे दत्ताराम रामजी लोंडे (30) रा.असर्जन ता.जि.नांदेड आणि शेख जिलानी शेख हाशम (35) रा.वाजेगाव ता.जि.नांदेड या दोघांविरुध्द या दोघांविरुध्द दाखल करण्यात आले आहेत.
ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार कल्याणकर, केंद्रे, पवार यांनी केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन अवैध वाहतुक गाड्या पकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
