नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस आणि महसुल आणि पंचायत समितीच्या लोकांनी मिळून एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह थांवला आहे.सोबतच अल्पवयीन बालिकेचा विवाह लावून देणाऱ्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विद्या पांडूरंग शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 1 मे रोजी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक विष्णु कऱ्हाळे, पोलीस अंमलदार विजय आडे, ग्रामसेविका विद्या शिकारे, पंचायत समितीचे बीडीओ हे सर्व जण त्या घटनास्थळावर गेले. मुलीचे आधार कार्ड पाहिले असता मुलीचे वय 16 वर्ष 6 महिने आहे आणि मुलाचे वय 26 वर्ष आहे. त्यानंतर पोलीसांनी आणि ग्रामसेविका विद्या शिखारे यांनी हे लग्न करता येत नाही. नाहीतर कायदेशीर अडचणी येतील हे समजून सांगितले. आणि तो विवाह रोखला. विद्या शिकारे यांच्या तक्रारीवरुन बालविवाह प्रतिबंधक अनियम 2006 मधील कलम 11 प्रमाणे अल्पवयीन बालिकेचा विवाह लावून देणाऱ्या तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीसाठी नांदेड ग्रामीण उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन यांनी विवाह रोखणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.
अर्धापूर पोलीस आणि पंचायत समितीने अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखला
