नांदेड(प्रतिनिधी)-नायब तहसीलदारांवर वाळू माफियांनी केलेला हल्ला तो खरा हल्ला होता की, बनावट एफआयआर देण्यात आला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण त्या दिवशी तिन गाड्या पकडल्या. त्यातील दोघांना सोडण्यात आल. तेंव्हा तिसऱ्याने वाद घातला. दोघांना एक न्याय आणि आम्हाला वेगळा असे चालणार नाही आणि त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार सांगतात वाळू माफियांची मुजोरी वाढली. पण प्रत्यक्षात महसुल यंत्रणेशिवाय वाळू माफियांची मुजोरी कशी वाढू शकते. याचे उत्तर शोधण्यासाठी एखादा विद्यावाचस्पती नेमावा लागेल.
परवा रात्री नायब तहसीलदार दिगलवार यांनी रात्रीच्यावेळी एका खाजगी गाडीत जाऊन ज्या खाजगी गाडीवर दुसऱ्या जिल्ह्याचा नोंदणी क्रमांक आहे. त्या गाडीत जाऊन छापा टाकला. या घटनेच्यावेळी त्या भागाच्या सज्जाचे तलाठी साहेब पण नव्हते. दुसऱ्याच सज्जाचे तलाठी साहेब होते. विजय पवार नावाच्या व्यक्तीची गाडी पकडली आणि ती गाडी तहसील कार्यालयात आणून रिकामी केली. ती रिकामी केलेले वाळू आताही तहसील कार्यालयात आहे. त्यानंतर दुसरी गाडी संजय कदम याची होती. ती लोहा मार्गावर कुठे तरी गुप्तस्थळी नेण्यात आली आणि तेथे त्या गाडीला मुक्त करण्यात आले. या दोन गाड्या मुक्त करण्याचे अनुक्रमे 100 आणि 50 मोदक घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
त्यानंतर तिसऱ्या गाडीवाला म्हणाला की, तुम्ही दोन गाड्या सोडल्या तर माझी पण सोडा. मोदक प्रसादासाठी मी पण तयार आहे. पण त्यावेळी झालेल्या वादानंतर नायब तहसीलदार दिगलवार यांनी पोलीसांसमक्ष हल्ला झाल्याची तक्रार दिली. त्याप्रमाणे गुन्हा क्रमांक 407/2025 दाखल झाला. या गुन्ह्यातील तिन आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. यानंतर आम्हाला मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पोलीस तहसील कार्यालयात गेले आणि तेथील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. कारण पोलीसांनी तहसील कार्यालयातील डम डाटा मिळण्यासाठी अगोदरच अर्ज केलेला आहे. पण तहसील कार्यालयाने आमचे सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे पोलीसांना सांगितले. असे सर्वच विभागत होत असते. जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मागितले जाते. तेंव्हाच सीसीटीव्ही फुटेज बंद असतात. नायब तहसीलदारांनी ज्या खाजगी गाडीमध्ये त्या ठिकाणी छापा टाकला. ती गाडी दुसऱ्या जिल्हयात नोंदणी झालेली आहे. सोबतच त्या गाडीचा क्रमांक एफआयआरमध्ये लिहिलेला नाही. ज्यावेळेस दोन गाड्या सोडल्या आणि तिसऱ्या गाडीचा वाद झाला. त्यावेळेस पोलीसांना बोलावले अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. मग तहसीलमध्ये रिकामी करण्यात आलेली वाळू कोणत्या गाडीतील आहे आणि लोहाकडे नेलेली गाडी त्या रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेली आहे. यावरुन वाळू माफियांनी महसुल पथकावर हल्ला केला हे सत्य मानायचे काय? पोलीस असते तर वाळू माफियांनी हल्ला कसा केला असता. मग तीन गाड्या पैकी एक गाडी पकडली तर दोन गाड्यांचे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एखादा विद्यावाचस्पतीचा विद्यार्थी शोधावा लागेल. जो या सर्व प्रकरणाचे संशोधन करू शकेल.

