शक्तीपीठ महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची तिखट प्रतिक्रिया

सरकारी लवजमा हात हलवत परत
नांदेड (प्रतिनिधी)- आज शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रिकाम्या हाताने परत पाठविले आहे. त्यासंबंधाचा पंचनामा तयार करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी भोगावजवळ घडली.
शक्तीपीठ महामार्गाचे प्रकल्प अभियंता सुनील देशमुख, मोनारचे संघटक चंद्रभागा शिंदे आणि पोलीस अंमलदार डी.बी. चाटे यांनी तलाठी सज्जा देऊप (खुर्द) आणि मालेगाव येथील तलाठी यांच्यासमक्ष हे अधिकारी भोगाव येथे गेले. त्या गटांमध्ये पोल रोवल्याचे काम करायचे होते. परंतु तेथील बाधित शेतकरी एकत्र झाले आणि याला विरोध करू लागले. या पंचनाम्यामध्ये लिहिल्याप्रमाणे यानंतर शेतात पाय ठेवालात तर अनुचित प्रकार घडेल असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांनी मोजणी प्रक्रिया त्वरीत थांबविण्याचे लेखी निवेदनही दिले. ज्यावर भोगाव येथील शेतकरी कविता ईश्वरराव वलबे, निजामोद्दीन जलालोद्दीन, मोहम्मद जमीर मोहम्मद गौस, जावेद, मोहम्मद रियाज मोहम्मद हाशम, खाजा मियॉ मोहम्मद हाशम, मोहम्मद अमीनोद्दीन, अशोक खोबराजी गोल्लारे, शेख बाबूमियॉ शेख नूरमियॉ, येनूबाई कोंडीबा कवणे, मोहम्मद फयाज मोहम्मद आशम, सुनमबाई वाघोजी गोल्लारे, मोहम्मद इस्माईल मोहम्मद बुरोद्दीन, नागोराव लक्ष्मण गोल्लारे, अमीनोद्दीन मोहम्मद हाशम, प्रतिभा रामेश्वर वलबे, आकाश अशोक गोल्लारे, सत्वशिला शाम गव्हाणे, गणपत माधव गव्हाणे, शिला दिनाजी गव्हाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पंचनाम्यावरील यातील पाच शेतकऱ्यांची नावे लिहिली आहेत, तसेच अधिकाऱ्यांवर यावर सह्या केल्या आहेत.
शक्तीपीठ समृद्धी महामार्ग जाहीर झाला होता तेव्हा एका सेवानिवृत्त पिटूला याचे समन्वयक करण्यात आले होते. त्यावेळी ए च्या शेताजवळून जाणारा हा महामार्ग बी च्या शेताकडे वळवण्यात आला. कारण समृद्धी महामार्ग हे उंचावरून जातात. पण ए ला फायदा मिळू नये हा बी चा प्रयत्न या घटनेत होता. कोणतेही काम करत असताना त्यात पारदर्शकपणा असणे आवश्यक आहे आणि तोच पारदर्शकपणा नसल्यामुळे आत भोगावच्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक भुमिकेमुळे शक्तीपीठ महामार्गातील अधिकाऱ्यांना रिकाम्याच हाताने परतावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!