डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थ शास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि मानव कल्याणासाठी झटणारे मानव मुक्तीदाते व समाजसुधारक होते. त्यांनी नवबौध्द चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य समाज एस.सी., एस.टी., ओबीसी व स्त्रिया विरुध्द होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. महिलांच्या व कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. दक्षिण आशिया खंडातुन दोनदा पि.एच.डी मिळवणारे ते एकमेव विद्यार्थी होते ते ब्रिटिश भारताचे मजुरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार व भाग्य विधाते असेही म्हणतात.
भारतीय राज्य सभेचे सदस्य मुंबई राज्यातून दिनांक 03/04/1952 ते 06/12/1956 पर्यंत ते सदस्य होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणुन त्यांचा कार्यकाळ 15/08/1947 ते 06/10/1951 पर्यंत कामकाज केले. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून दि. 30/08/1947 ते दि. 24/01/1950 पर्यंत कामकाज केलेले आहे. भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणून दिनांक 09/12/1946 ते 24/01/1950 पर्यंत राहिलेले आहेत. त्यांचा मतदार संघ बंगाल प्रांत सन 1946 ते 1948 व मुंबई राज्य सन 1947 ते 1950. ब्रिटीश भारताचे मजुर मंत्री, उर्जामंत्री व बांधकाम मंत्री म्हणून ब्रिटीश व्हॉइसरॉयचे कार्यकारी मंडळात नेमणुक दिनांक 20/04/1942 ते 20/10/1946 पर्यंत होते. मुंबई विधान सभेचे सदस्य म्हणून इ.स. 1937 ते 1942 तसेच मुंबई विधी मंडळाचे सदस्य म्हणून डिसेंबर 1926 ते 1937 पर्यंत कामकाज केलेले आहे. म्हणजेच त्यांच्याकडे प्रशासनाचा दिर्घ अनुभव आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उघडण्यासाठी वरील प्रमाणे पाश्र्वभुमी नमूद करण्यात आली आहे.
रुपयाची समस्या त्याचे मुळ व त्यावरील उपाय अर्थात दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ईट्स ओरीजीन अॅण्ड ईट्स सोल्युशन नावाचा 257 पानांचा दिर्घ शोध निबंध मार्च 1923 मध्ये लंडन स्कुल ऑफ ईकॉनॉमिक्स (LSE) येथे डॉक्टरेट प्रबंधक म्हणून सादर केला. त्यावेळेस त्यांचे वय अवघे 32 वर्षाचे होते. त्यात डॉ. आंबेडक रांनी भारताच्या राष्ट्रीय चलनाशी रुपयाशी संबंधीत समस्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर यांनी कोलंबीया विद्यापिठ आणि लंडन स्कुल ऑफ ईकॉनॉमिक्स (LSE) या शिक्षण संस्थामधून अर्थशास्त्र विषयात पि.एच.डी. पदव्या मिळवल्यात. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दित ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकिल होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक, राजकिय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चामध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दिनदलित पिडीतासाठी राजकिय हक्काचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मीतीत मोलाचे योगदान दिले.
भारतीय चलन व्यवस्था व बँकांचे इतिहास यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंड देशात जावून इंग्रजांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजांना भारताचे लुटारु म्हणून सिध्द करणाज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमध्येच डि.एस्सी ही सर्वोच्च पदवी इंग्रजांनी दिली. ही जगातील सर्वात आश्चर्य कारक घटना होय. डॉ. आंबेडकरांच्या तोडीचा एकही विद्वान भारतातच नव्हे तर जगात सुध्दा नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या रुपयाची समस्या त्याचे मुळ व त्यावरील उपाय याप्रबंधात एकुण 7 बाबींचा उहापोह केल्याचे दिसून येते. आंबेडकरांच्या मते कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था हि तिच्या शिल्लक असलेल्या गंगाजळी वरुन ठरवल्या जात असते.
1) दुहेरी प्रमापापासून रौप्य प्रमापाकडे 2) रौप्य प्रमाप आणि त्याच्या प्रमाणत्वा वरील असंतूलन. 3) रौप्य प्रमाण आणि त्याच्या अस्थीरतेची अनैतिकता. 4) सुवर्ण प्रमापाकडे (Towards a Gold Standard). 5) सुवर्ण प्रमापाकडून सुवर्ण विनिमय प्रमापाकडे. 6) विनिमय प्रमापातील स्थिरता (Stability of Exchange Standard). 7) सुवर्ण प्रमापाकडे पुनरागमन (A return to A gold Standard).
अशा प्रमाणे वरील बाबींचा सन 1958 ते 1920 या कालखंडातील आकडेवारीसह पुरावे देवून सिध्द केले व त्यामध्ये सुवर्ण विनियम प्रमाण बाध करुन थेट सुवर्ण प्रमाण आणा कारण चलन प्रमाणाच्या या दोन्ही पध्दती आता इतिहास जमा झाल्या आहेत. ईस्ट इंडिया कंपनी ही वेगवेगळे करांची आकारणी करुन भारतीयावर जिजिया कर लावीत आहे ती अन्याय कारक आहे. ब्रिटीश सरकार भारतीय सोन्या व चांदीचा दर कमी आकारीत असून भारताच्या रुपयाच्या प्रमाणात त्याचे मुल्य कमी करीत आहे व प्रमाणा संबंधीच्या धोरणात सतत बदल करीत आहे. तसेच अर्थचलन विषयक प्रा.केन्स या विख्यात अर्थशास्त्रज्ञाचे मत डॉ. आंबेडकरांनी फोडून काढले आहे.
डॉ. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय योगदाना बद्दल फारशे कुठेही बोलले जात नाही, लिहले जात नाही. एक अर्थतज्ञ म्हणून त्यांनी रुपयाच्या प्रश्नावर केलेले विश्लेषन म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ रुपी.
आज जेंव्हा आपण सातत्याने रुपया आणि डॉलर यांच्या मुल्याबाबत बोलतो, आयात -निर्यात व्यापारी तूट यावर बोलतो, डॉलरच्या तुलनेत घसरणाज्या रुपयाच्या मुल्यावर चर्चा केली जाते तेंव्हा डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय काम हे अत्यंत समकालीन होते. म्हणजेच त्यांनी भविष्याचा किती सखोल अभ्यास केला असेल याची कल्पना न केलेली बरी. अत्यंत दूर दृष्टी ठेवून त्यांनी आपले विचार स्पष्टपणे नमुद केलेले आहेत. जवळ जवळ 200 वर्षाच्या व्यापारी विषयक अभ्यास करुन शुक्ष्म निरिक्षणे नोंदवून त्यांनी आपले विचार स्पष्ट केलेले आहेत व सदरील प्रबंधात नोंदवीलेले आहेत.
जागतिक पातळीवर आपण पाहिले तर पहिला आंतररष्ट्रीय ख्यातीचा अर्थतज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव सर्वप्रथम समोर येते. त्यांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानाची दखल त्यावेळी युरोप आणि अमेरिकेने घेतली गेली होती. मात्र दुर्देवाने भारतात याची दखल घेतली गेली नाही हे खेदाने नमुद करावेशे वाटते.
भारता समोरील आर्थिक प्रश्न, चलनाचा प्रश्न, रुपया समोरील आव्हाने, ब्रिटीशांनी लागु केलेल्या चलन व्यवस्थेमुळे भारताला तोंड दयावी लागत असलेली संकटे याची मांडणी करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा भरपुर उपयोग केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक पतधोरण, सार्वजनिक वित्त पुरवठा, शेतीचे अर्थशास्त्र, समाजातील आर्थिक व्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था इत्यादी विषयावर देखील विपुल चिंतन आणि लेखन केलेले आहे.
भारतीय रुपयाच्या वटनावरीचा दर रुपयाची कृयशक्ती वाढणे सुवर्ण आणि चांदी यांचे वेगवेगळे दर असणे, चांदीचा दर अस्थीर असल्यामूळे चांदीचे अवमुल्यन, सोन्याची वाढीव किंमत, कमी विनीमय दर ठेवून आर्थिक लूट करणे हे ब्रिटिशांचे धोरण राहिलेले आहे. भारतात पराकेटीची आर्थिक विषमता आणि ब्रिटिशांच्या अर्थनितीमूळे रुपया समोर आणि पर्यायाने भारता समोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची मांडणी डॉ. आंबेडकरांनी या महान ग्रंथात केली असून आजही ते विश्लेशन जशास तसे कायम आहे.
विख्यात अर्थशास्त्रज्ञ जे.एम.केन्स हे रॉयल कमिशनचे अध्यक्ष होते. सन 1910 मध्ये युनिवर्सल पिपल करंन्सी अॅक्ट त्यांनी आणला. केन्सचा सिध्दांत असे सांगतो की, चलन क्षेत्र व वास्तवक्षेत्र ह्या दोन क्षेत्रांचा विचार करुन पैशाचे मुल्य, चलनक्षेत्र व वास्तवक्षेत्र ह्या दोहोवर अवलंबून असते. चलनक्षेत्रातील पैशांची संख्या व वास्तवक्षेत्रातील पैशांची मागणी, किंमत पातळी, गुंतवणूक, उत्पन्न व व्याजदराद्वारे पैशाचे मुल्य निश्चीत करते. याबाबीचे खंडण डॉ. आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात केलेले आहे.
इस्ट इंडिया कंपनी भारतात जवळपास 1772 ला आली. सन 1772 ते 1780 या काळात वॉरेन हेस्टींग गव्हर्नर जनरल यांनी भारतात बेंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतात ब्रिटिश कंपनीचा अंमल लागु केला. सन 1840 ला बँक ऑफ बॉम्बे व सन 1843 ला बँक ऑफ मद्रास या बँका स्थापन करण्यात आल्या. पुढे यातून प्रेसीडेन्सी बँकेची निर्मीती झाली. सन 1921 मध्ये इंम्पेरिअल बँकेची स्थापना झाली व ती सन 1934 पर्यंत कार्यरत होती. सदर बँकेला मध्यवर्ती बँकेची सर्व कामे करणारी बँक म्हणून ओळखल्या गेली. पुढे दिनांक 01/04/1935 रोजी आर.बी.आय. (RBI) ची स्थापना झाली. ब्रम्हदेश 1937 ला भारता पासून वेगळा झाला. सन 1937 साली त्याचे मुख्यालय मुंबईला स्थलांतर झाले. दिनांक 05/08/1947 ते 30/06/1948 पर्यंत आर.बी.आय. पाकिस्तान मध्ये कार्यरत होती.
डॉ. आंबेडकरांचे शिक्षक व मार्गदर्शक प्रो. अॅडविन कॅनन लंडन विभागाचे प्रमुख यांपी द प्रॉब्लेम ऑफ रुपी पुस्तकाच्या प्रास्ताविकात डॉ. आंबेडकरांचे विचार पटत नसूनही हे विचार नवे आहेत. सैध्दांतिक दृष्टया पक्के आहेत आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून केलेले आहेत. असे नमुद केले आहे.
इ.स. 1923 च्या दुसज्या तिमाहित डॉ. आंबेडकरांची डि.एस्स्सी. या सर्वोच्च पदासाठी मौखीक परिक्षा घेण्यात आली. परिक्षा घेणारे डॉ. हेराल्ड लस्की सारखे जगप्रसिध्द 6 अर्थतज्ञ बसले होते. अॅडव्हर्ट यंग, जहांगीर कुवर, प्रो. अॅडवीन कॅनन या सर्व जनांनी दि. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध वाचला. यात जगभरात मान्यता पावलेला प्रो. केन्स यांचा अर्थशास्त्राचा सिध्दांत चुकीचा असून त्यावर आधारलेली ब्रिटिश सरकारचे धोरण भारतातील जनतेची लुट करतांना रुपयाच्या विनिमय दराचे माध्यमे वापरते हा या प्रबंधाचा मुख्य विषय आहे. हा प्रबंध म्हणजे इंग्रज राज्य कत्र्यांच्या विरोधात असल्याने या प्रबंधाला अमान्य करुन डॉ. आंबेडकरांना नापास करावे हे तज्ञांनी ठरवले. तत्पश्चात बाबासाहेबांची मौखीक परिक्षा घेण्यात आली. परिक्षकांनी धोरणाविषयी प्रश्न विचारले त्यात ते हरले. मग सिध्दांता विषयी प्रश्न विचारले त्यात ते हरले. मग चिकित्सा पध्दती विषयी प्रश्न विचारले त्यातही त्यांची निराशा झाली मग त्यांनी प्रबंधात लिहीलेल्या काही शब्दावर आक्षेप घेतला. बाबासाहेबांनी त्यांचीच डिक्शनरी काढून त्या शब्दांचे अर्थ दाखवले आणि त्या अर्थासाठीच ते शब्द वापरले हे सांगीतले. शेवटी त्यांचा पुर्ण नाईलाज झाला व तडजोडीची बोलणी सुरु झाली. त्यावर आंबेडकर म्हणाले केवळ डिग्री मिळवण्यासाठी म्हणून मी तडजोड करणार नाही. असे म्हणून ते पुढील शिक्षणासाठी जर्मनीला निघून गेले. केवळ डिग्रीसाठी कुठलीही न करणारे आंबेडकर हे जगातील एकमेव उदाहरण आहेत. आंबेडकरांचे मार्गदर्शक श्री. अॅडमीन कॅनन यांनी आंबेडकरांना जर्मनी वरुन सन्मानाने बोलावून डि.एस्सी. ही लंडन विद्यापिठाची सर्वोच्च पदवी बहाल केली. विश्वबँक व अंतरराष्ट्रीय नाणे निधी या सारख्या संघटना सुध्दा आजघडीला डॉ. आंबेडकरांचे तत्वज्ञान अंगीकार करुन वाटचाल करीत आहेत. भारतीय आर.बी.आय बँक या बँकेचा जन्म सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातुनच झाला. असा हा अर्थतज्ञ यापुर्वी झाला नाही व पुढेही होणे शक्य नाही. अशा या महान अर्थशास्त्रज्ञाला कोटी कोटी विनम्र अभिवादन..
_ॲड.मिलिंद कदम
मो नं. 9423138283.