नांदेड(प्रतिनिधी)-इमारत बांधकाम करून दिल्यानंतर उर्वरीत पैसे न दिल्याप्रकरणी सहा वर्षानंतर तिन जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर माणिकराव फड हे व्यवसायाने गुत्तेदार आहेत. त्यांनी सन 2019 मध्ये सलमा बेगम गौस खान पठाण, गौस खान पठाण आणि शाहरुख खान पठाण यांच्याकडून त्यांचे कॅनॉल रोडवरील मच्छी मार्केटजवळ असलेल्या भुखंडावर घर बांधून देण्याचा ठेका घेतला. हा ठेका 39 लाख रुपयांमध्ये घेतला होता. इमारत बांधकाम पुर्ण करून त्यांनी इमारतीचा ताबा पठाण कुटूंबियांकडे दिला. त्या एकूण रक्कमेपैकी 29 लाख रुपये रोख स्वरुपात मिळाले. त्यातील 10 लाख रुपये शिल्लक राहिले होते. तसेच ठरलेल्या बांधकामापेक्षा अतिरिक्त बांधकाम करून घेतले. त्याचे 1 लाख 95 हजार रुपये त्यांनी दिले नव्हते. आपले एकूण पैसे 11 लाख 95 हजार रुपये वारंवार मागून त्यांनी दिले नाही आणि अखेर पैसे मागितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 504, 506, 34 नुसार गुन्हा क्रमांक 216/2025दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार सविता केळगंद्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
इमारत बांधून दिल्यानंतर पैसे बुडविणाऱ्या तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल
