नांदेड-मुलांमधील पाण्याची भीती जाऊन साहसी वृत्ती निर्माण व्हावी. सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग जलतरणाची सर्वोत्तम आरोग्यदायी जीवनदायी कला आत्मसात व्हावी, म्हणून गोदावरी ऍक्वेटिक असोसिएशनने सात वर्षांवरील मुलामुलींसाठी दिनांक २० एप्रिल ते ११ जून २०२५ असा ४५ दिवसांचा तंत्रशुद्ध जलतरण प्रशिक्षण वर्ग कै. शांतारामजी सगणे जलतरणीका गोकुळ नगर येथे सकाळी दहा ते अकरा व सायंकाळी सात ते आठ या वेळेत योजला आहे. अनुभवी प्रशिक्षक, ४५ दिवसात जलतरण कला अवगत होण्याची हमी. नंतर प्रशिक्षणार्थ्यांच्या जलतरण स्पर्धा. दृकश्राव्य माध्यमातून अचूक व सर्वांगीण मार्गदर्शन ही वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत वर्गाचे ४५ दिवसांचे शुल्क रुपये २५०० आहे. पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील आढाव व सचिव प्राध्यापक ओम प्रकाश गुंजकर यांनी केले आहे. इच्छुक पालकांनी जलतरणीकेवर प्रशिक्षक राजेश सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश मर्यादित आहेत याची नोंद घ्यावी.
More Related Articles
देगलूर नाका भागात कुलर गोडाऊनला आग; ३० लाखांचे नुकसान
नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर नाका भागात बरकत कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या कुलर गोडाऊनला दुपारी १ वाजता अचानक…
संकटसमयी देवदूत ठरले अग्निशमन दल — चिमुकल्याचे सुखरूप रेस्क्यू
नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 05 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 13:55 वाजता केशव नगर, हनुमानगड कमानीच्या…
नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ
• केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी…
